छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सैनिकांना पुन्हा एकदा नक्षलवाद्यांविरुद्ध मोठे यश मिळाले आहे. भैरमगड आणि मीरपूर पोलिस स्टेशन परिसरात कारवाई करताना सैनिकांनी सात नक्षलवाद्यांना अटक केली आहे. एवढेच नाही तर या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये जिलेटिनच्या काड्या, टिफिन बॉम्ब, बॅटरी, स्फोटके आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. नक्षलवाद्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
स्थानिक पोलिस आणि जिल्हा राखीव दलाच्या संयुक्त पथकाने बिजापूरच्या वेगवेगळ्या भागात गस्त घालण्याचे काम केले. ही मोहीम जिल्ह्यातील भैरमगड आणि मिरतूर पोलीस स्टेशन परिसरात राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान दोन्ही ठिकाणांहून एकूण सात नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली.
याबाबत माहिती देताना पोलिस अधिकारी म्हणाले, संयुक्त पथक जिल्ह्यातील कोलनार आणि दलेर गावात गस्त घालण्यासाठी गेले होते. यादरम्यान, दलेर गावातील जंगलातून सहा नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. येथील नक्षलवाद्यांकडून टिफिन बॉम्ब, कार्डेक्स वायर, जिलेटिनच्या काड्या, स्फोटके, बॅटरी आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
याशिवाय, मिरतूर पोलिस स्टेशन परिसरातून एका नक्षलवाद्याला अटक करण्यात आली. या नक्षलवाद्याकडून एक बॅकपॅक जप्त करण्यात आला. त्यामधून टिफिन बॉम्ब, बॅटरी, विजेच्या तारा, फटाके इत्यादी जप्त करण्यात आले. सातही नक्षलवाद्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. यानंतर सर्वांना तुरुंगात पाठवण्यात आले.
हे ही वाचा :
ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाचे २.२ अब्ज डॉलर्सचे अनुदान गोठवले; काय आहे कारण?
मुर्शीदाबादेत दंगलखोरांकडून लाखोंची लूट, कायमचा बीएसएफ कॅम्प हवा!
‘गुजराती’ माणूस रायगडावर ‘मराठी’ उबाठा गडाखाली
इस्रायल- हमासमधील युद्धबंदीची चर्चा फसली; ‘ही’ आहेत कारणे
दरम्यान, शनिवारी (१२ एप्रिल) याआधी, बिजापूरमध्येच सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. ही चकमक विजापूरमधील इंद्रावती भागात घडली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये नक्षलवादी कमांडर अनिल पुनीमसह तिघांचा समावेश होता. नक्षलवादी अनिल पुनीमवर ५ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.