अरुणाचलमध्ये हिमस्खलनात अडकलेले सात जवान शहिद

अरुणाचलमध्ये हिमस्खलनात अडकलेले सात जवान शहिद

अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनात अडकून बेपत्ता झालेले भारतीय लष्कराचे सातही जवान शहीद झाले आहेत. मंगळवारी ही माहिती देताना भारतीय लष्कराने सांगितले की, अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात भारत-चीन सीमेवर हिमस्खलनामुळे बेपत्ता झालेल्या सात जवानांचे मृतदेह सापडले आहेत.

६ फेब्रुवारी रोजी लष्कराचे जवान गस्त घालत होते आणि रविवारी झालेल्या कामेंग सेक्टरमधील उंचीवर असलेल्या हिमस्खलनात हे जवान अडकले होते. अडकलेल्या जवानांना शोधण्यासाठी त्याच दिवसापासून शोध आणि बचाव कार्य सुरू होते.

मात्र भारतीय लष्कराने आता त्या सर्व जवानांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. लष्कराला त्या सर्व जवानांचे मृतदेह सापडले आहेत. या भागातील हवामान गेल्या काही दिवसांपासून खराब आहे आणि येथे जोरदार बर्फवृष्टी होत आहे. लष्कराने सांगितले की शोध आणि बचाव कार्य आता संपले असून हिमस्खलनाच्या ठिकाणाहून सातही जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हा भाग १४ हजार ५०० फूट उंचीवर आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून या भागात मुसळधार बर्फवृष्टीसह प्रतिकूल हवामान आहे.

” अरुणाचल प्रदेशातील हिमस्खलनात भारतीय लष्कराचे जवान शहीद झाल्यामुळे मला दु:ख झाले आहे. त्यांनी देशासाठी केलेली अनुकरणीय सेवा आम्ही कधीही विसरणार नाही.” असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’

संजय राऊतांचे ‘ते’ पत्र पाहून त्यांची कीव वाटते

काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुमत, तरी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजपाचीच सरशी! नेमके काय घडले लातूरमध्ये?

मलाला, कट्टरतावादी अजेंडा चालवते! भाजपा नेते कपिल मिश्रांचा निशाणा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, ” अरुणाचल प्रदेशात हिमस्खलनात झालेल्या भारतीय लष्कराच्या जवानांच्या हौतात्म्याने अतिशय दु:ख झाले आहे, या शूर जवानांनी देशाची सेवा करताना प्राण गमावले. त्यांच्या धैर्याला आणि सेवेला माझा सलाम.” असे त्यांनी ट्विट केले आहे. यांच्यासोबतच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जवानांच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version