रतन टाटांनी घेतला निरोप, मात्र, निघताना नोकर आणि श्वानाचीही केली सोय!

मृत्यूपत्र आले समोर

रतन टाटांनी घेतला निरोप, मात्र, निघताना नोकर आणि श्वानाचीही केली सोय!

उद्योगपती रतन टाटा यांनी ९ तारखेला अखेरचा निरोप घेतला. आयुष्यभर साधेपणाचे उदाहरण असलेल्या रतन टाटा यांनी निघतानाही आपल्या औदार्याचा दाखला दिला. रतन टाटांच्या मृत्युनंतर आता त्यांचे मृत्यूपत्र समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी आपले पाळीव श्वान जर्मन शेफर्ड ‘टिटो’साठीही एक भाग ठेवला आहे. तसेच रतन टाटांनी त्यांचे कुक राजन शॉ आणि त्यांचा सेवक सुब्बिया यांचीही व्यवस्था केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, रतन टाटा यांची वैयक्तिक संपत्ती अंदाजे १०,००० कोटी रुपये आहे. ही संपत्ती त्यांचा भाऊ जिमी टाटा, त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन आणि दिना जीभोय यांच्यामध्ये विभागली जाणार आहे. तर उर्वरित बहुतेक मालमत्ता त्यांच्या स्वतःच्या फाउंडेशनला देण्यात आली आहे, जी टाटा कुटुंबाची परंपरा आहे.

रतन टाटांच्या मालमत्तेचा काही भाग त्यांचा जर्मन शेफर्ड श्वान ‘टिटो’साठी ठेवण्यात आला आहे. यासोबत ‘टिटो’ जिवंत असेपर्यंत त्याची काळजी घेतली जाणार असून याची जबाबदारी त्यांचे कुक राजन शॉ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

“लोकसभेत माविआचा कोकणातून एकही खासदार निवडून आला नाही आता आमदारही दिसणार नाही”

खलिस्तानी दहशतवादी बलजीत सिंगला अटक!

पुण्यातून नाकाबंदीदरम्यान सापडले १३८ कोटींचे सोनं

जेएनयूमध्ये होणारी इराण, पॅलेस्टाईन, लेबेनॉनच्या भारतातील राजदूतांची व्याख्याने रद्द

रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात त्यांचे कुक राजन शॉ आणि  जवळपास ३० वर्षे त्यांचे सेवक म्हणून काम केलेले सुब्बिया यांच्यासाठीही मालमत्तेची तरतूद करण्यात आली आहे. रतन टाटा यांचे त्यांच्या घरातील कर्मचाऱ्यांशी इतके घनिष्ठ नाते होते की, परदेश दौऱ्यावरून परतताना ते त्यांच्यासाठी डिझायनर कपडे देखील आणत असत.

रतन टाटा यांचे दीर्घकाळचे सहकारी शंतनू नायडू यांनाही त्यांच्या मृत्युपत्रात स्थान मिळाले आहे. शंतनू नायडू यांच्या ‘गुडफेलोज’ या स्टार्टअपमधील असलेली हिस्सेदारी रतन टाटांनी रद्द केली आणि शंतनू नायडू यांना परदेशात शिक्षणासाठी दिलेले कर्जही माफ केले. परंपरेनुसार, टाटा सन्समधील त्यांचा हिस्सा टाटा एंडॉवमेंट फाउंडेशनकडे (RTEF) हस्तांतरित केले जाईल.

 

Exit mobile version