सिरम इन्स्टिट्युटकडून लसींची किंमत जाहिर

सिरम इन्स्टिट्युटकडून लसींची किंमत जाहिर

सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने (एसआयआय) अखेरीस कोविशिल्ड लसीच्या किंमतीबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. एसआयआय सरकारी रुग्णालयांना ₹४०० दराने लस विकणार आहे तर ₹६०० या दराने खासगी रुग्णालयांना लस विकणार आहे. त्यामुळे भारतीय लसीकरणाच्या मोहिमेतील महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कंपनीच्या लसीच्या किंमतीबाबत स्पष्टता मिळाली आहे.

या निर्णयाबरोबरच सिरमने त्यांच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्के उत्पादन केंद्र सरकारला आणि ५० टक्के राज्य सरकारला आणि खासगी रुग्णालयांना विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबरच कंपनीने पुढील दोन महिन्यात लसीची उत्पादन क्षमता वाढवण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

रिलायन्सकडून ७० हजार रुग्णांना मिळणार ऑक्सिजन

जमत नसेल तर पालकमंत्री पद सोडा

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, अकरा रुग्णांचा मृत्यू

कोरोनामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप धोक्यात?

सिरम इन्स्टिट्युट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सिरमच्या लसींना जगातील विविध देशांतून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

भारताच्या लसीकरण मोहिमेत दोन लसींची महत्त्वाची भूमिका आहे. यात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्याबरोबरच भारत सरकारने स्पुतनिक-५ च्या वापराला देखील परवानगी दिली आहे. त्याशिवाय भारत सरकारने अधिक चार लसींना भारतातील ट्रायलशिवाय परवानगी देण्याचे धोरण देखील स्विकारले आहे.

भारताने लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी पासून सुरूवात केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकेका वयोगटासाठी लसीकरण खुले केले. आता भारत सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण खुले केले आहे.

Exit mobile version