भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना आज म्हणजेच रविवारी खेळला जाईल. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडने दुसरा एकदिवसीय सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. ही मालिका जिंकण्यासाठी भारताला तिसरा सामना जिंकावाच लागणार आहे.
या सामन्यालाही दुपारी दीड वाजता सुरवात होणार असून हाही सामना आधीच्या दोन एकदिवसीय सामन्यांप्रमाणेच पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये खेळाला जाणार आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्व एकदिवसीय सामने हे पुण्यातच घेण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारच्या अकलेचं दिवाळं निघालाय का?
पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढले ३५००० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण
महाराष्ट्रात जमावबंदीची नियमावली जारी
पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी त्रस्त, भाजपा कार्यकर्त्याला फोन करून मदतीची विनवणी
पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर दमदार विजय मिळवला होता. भारताने ३१८ धावांचे लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवले होते. याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी शंभरपेक्षा जास्त धावांची सलामी खेळी केली. परंतु नंतर भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडचे फलंदाज कमी कालावधीत बाद केले आणि इंग्लंडचे सर्व गाडी २५१ धावांवर बाद झाले. दुसऱ्या सामन्यातही भारताचीच प्रथम फलंदाजी होती. भारताने ३३६ धावा केल्या. परंतु त्या सामन्यात इंग्लंडने ३३७ धावांचे हे लक्ष्य सहज सध्या केले आणि सामना जिंकला. या सामन्यानंतर तीन सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने १-१ अशी बरोबरी सध्या केली. त्यामुळे आता आज होणारा हा तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.