देशभरात आता दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांचे बलीदान लक्षात राहवे यासाठी हा दिवस देशभरात साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे.
गृह मंत्रालयाने याबद्दल अधिसूचना जारी केली आहे. हैदराबाद १५ ऑगस्ट रोजी भारत स्वातंत्र झाल्यानंतर देखील १३ महिने निजामांच्या शासनाखाली होता आणि त्याला स्वतंत्र्य मिळाले नव्हते. ऑपरेशन पोलो नावाच्या पोलीस कारवाई नंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाच्या शासनापासून मुक्तता मिळाली. गृह मंत्रालयाने म्हटलं की या भागातील लोकांती मागणी होती की १७ सप्टेंबर ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजार केला जावा. तसेच हैदराबादला स्वतंत्र्य मिळवून देणाऱ्या शहीदांच्या आठवणीत आणि तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवण्यासाठी मोदी सरकारने दरवर्षी १७ सप्टेंबर हा ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.
Government of India has decided to celebrate 17th September every year as “Hyderabad Liberation Day”. pic.twitter.com/RfdnGG9frM
— ANI (@ANI) March 13, 2024
हे ही वाचा:
पाकिस्तानी नागरिक म्हणातायत, पंतप्रधान मोदींना सलाम!
लोकसभा निवडणूक : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली; ९० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब!
उमेश गुप्ता स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई श्रीचा विजेता
राजस्थानमध्ये तेजस विमान कोसळले
१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. तो दिवस १७ सप्टेंबर ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आता दरवर्षी देशभरात ‘हैद्राबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा होणार आहे. भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीखाली होते. यावेळी रझाकारांनी येथील लोकांवर खूप अत्याचार केले. तेव्हा हैदराबादच्या तत्कालीन निजामाने भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध करत पाकिस्तानात सहभागी होण्याची किंवा मुस्लीम देशाची मागणी केली होती. तेव्हा येथील नागरिकांनी हैदराबाद भारतात विलीन करण्यासाठी रझाकारांच्या अत्याचाराविरोधात लढा दिला.