१० वर्षांत सेन्सेक्स २५ हजारांवरून ७५ हजारांवर!

आतापर्यंतची सर्वाधिक उंची

१० वर्षांत सेन्सेक्स २५ हजारांवरून ७५ हजारांवर!

३८ वर्षांपूर्वी १०० गुणांनी सुरुवात झालेला मुंबईचा सेन्सेक्स मंगळवारी तब्बल ७५ हजारांवर पोहोचला. त्यामुळे भारताच्या वेगवान घोडदौडीचे हे द्योतकच मानले जात असून आणखी संपत्ती निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक जिंकून सत्तेवर आले होते, तेव्हा सेन्सेक्स २५ हजारांवर होता. अवघ्या १० वर्षांत या सेन्सेक्सने ७५ हजारांची मजल गाठली आहे.

मंगळवारी सेन्सेक्स खुला झाला तेव्हाच तो ७५,१२४वर म्हणजेच आतापर्यंतच्या सर्वाधिक उंचीवर पोहोचला. त्यानंतर काही जणांनी फायदा घेण्यासाठी समभागांची विक्री केल्यामुळे सेन्सेक्स ५९ अंशांनी घसरून ७४,६८४वर स्थिरावला. बीएसई सेन्सेक्ससह एनएसई म्हणजेच निफ्टीही त्यांच्या सार्वकालिक उंचीवर पोहोचला. मंगळवारी निफ्टी २२,७६८वर पोहोचला होता. नंतर २४ अंशांनी घसरून २२,६४३वर घसरला. अमेरिकत महागाई दर वाढल्याने येथील गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आणि त्यांनी काही प्रमाणात गुंतवणूक काढली.

त्यामुळे थोडी घसरण झाल्याचे जीओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन विभागाचे प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. अमेरिकेच्या महागाई दरात वाढ झाल्याने तेथील बँकेने दरकपात केल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला.मुंबईचा सेन्सेक्स ७५ हजारांवर पोहोचल्याने बाजार भांडवल ४०० लाख कोटींवर पोहोचले आहे. गेल्या १० वर्षांत, जेव्हापासून मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तेत आल्यापासून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत पाचपट वाढ झाली आहे.

हे ही वाचा:

हैदराबादचा घरच्या मैदानाशिवाय पहिलाच विजय!

“भविष्य पाहायचे आणि अनुभवायचे असेल तर भारतात या”

दिल्ली उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर केजरीवाल ठोठावणार सर्वोच्च न्यायालयाची दारे

मविआतील जागा वाटपाच्या पूर्णविरामानंतर स्वल्पविराम

फिनवेसिया या वित्तविषयक कंपनीचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सर्वजीत सिंग वर्क यांच्या मते, सेन्सेक्सचा ७५ हजारांचा टप्पा केवळ भारतीय बाजारपेठेतील भूतकाळातील यश दर्शवत नाही तर भविष्यातील वेगवान विकासवाढीचे द्योतक आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास वाढला असून हे गुंतवणूकदार भविष्यातील आशादायक प्रवासासाठी आतूर आहेत.

भारताची अर्थव्यवस्था १.७ ट्रिलियन डॉलरवरून ४.८ ट्रिलियन डॉलरवर पोहोचणे, सर्वांत जलदगतीने होणारी आयपीओ प्रक्रिया, जगातील सर्वांत वेगवान टी अधिक १ सेटलमेंट यंत्रणा यामुळे अधिकाधिक गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत आहेत. आता ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो, याकडे सर्व जण डोळे लावून बसले आहेत. त्यात स्कायमेटने चांगल्या मान्सूनचा अंदाज वर्तवल्याने भारताची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version