31 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरविशेषशेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन

Google News Follow

Related

शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. नारायण ज्ञानदेव पाटील यांचे सोमवारी, १७ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांची प्रकृती बिघडल्याने कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ११ जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेव्हापासूनच त्यांची प्रकृती खालावली होती.

एन. डी. पाटील यांनी गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ शेतकरी, कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याचे काम केले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांना मे २०२१ मध्ये कोरोना संसर्ग झाला होता. त्यावेळी पाटील यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती.

एन. डी. पाटील यांचा जन्म सांगलीमधील एका शेतकरी कुटुंबात १५ जुलै १९२९ रोजी जन्म झाला. पुणे विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. तसेच एल. एल. बीची पदवीही त्यांनी घेतली होती.

हे ही वाचा:

ख्रिश्चन धर्म स्वीकारा; भेटवस्तूची आमिष दाखवून शिक्षकाची शिकवण

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गाझी याचा कराचीत मृत्यू

मुंबईकरांना दिलासा; कोरोना रुग्णांची संख्या घटतेय

सोन्याची लंका कुणी लुटली?

सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते. तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टरही होते. त्यानंतर १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये ते प्राचार्य म्हणून रुजू झाले. शिवाजी विद्यापीठात ते पहिल्या पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य होते. त्यानंतरही त्यांनी शिवाजी विद्यापीठात अनेक पदांची जबाबदारी सांभाळली.

१९४८ मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. १९५७ साली ते मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस बनले. तब्बल १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे एन. डी. पाटील हे सदस्य होते. शेकापचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. १९७८- १९८० या कालावधीत ते महाराष्ट्राचे सहकारमंत्री होते. १९८५- १९९० या काळात ते महाराष्ट्र विधानसभा सदस्य होते. तसेच महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य आणि सीमा चळवळीचे प्रमुख नेते म्हणूनही पाटील यांची ओळख होती. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना भाई माधवराव बागल पुरस्कार, शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार आदी पुरस्कारही मिळाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा