पत्रकार रवीश तिवारी कालवश

पत्रकार रवीश तिवारी कालवश

पत्रकार रवीश तिवारी यांचे आज निधन झाले आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रासाठी ते राजकीय संपादक तर चीफ ऑफ नॅशनल ब्युरो म्हणून काम पाहत होते. जवळपास गेले दीड वर्ष तिवारी यांची कॅन्सरशी झुंज सुरू होती. आज शनिवार, १९ फेब्रुवारी रोजी त्यांची हे झुंज संपली असून आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळीच त्यांच्या निधनाचे वृत्त बाहेर आले.

पत्रकार म्हणून आपल्या कारकीर्दीत तिवारी यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रासाठी त्यांनी राष्ट्रीय राजकारण, लोकसभा निवडणुका, विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका, पंतप्रधान कार्यालय, पायाभूत सुविधा, कूटनीतीक संबंध अशा अनेक बाबींवर काम केले आहे. ते ४० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १०० ‘किसान ड्रोन्स’ ना हिरवा झेंडा

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम…..

‘दिशा सालियनचा पोस्टमॉर्टेम अहवाल कुठे आहे? डॉक्टरांना कुणी दम दिला’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत रवीश तिवारी यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘‘नियतीने रविश तिवारी यांना आपल्यातून फारच लवकर नेले. त्यांच्या निधनामुळे माध्यम विश्वातल्या एका उज्ज्वल कारकिर्दीचा अंत झाला आहे. मला त्यांचे लेखन वाचायला आवडायचे. तसेच त्यांच्याबरोबर वेळोवेळी मी संवादही साधत होतो. रविश तिवारी अंतर्दृष्टी असलेले नम्र पत्रकार होते. त्यांच्या कुटुंबियांविषयी आणि त्यांच्या अनेक मित्रांविषयी माझ्या संवेदना व्यक्त करतो. ओम शांती!” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version