राजस्थान;नाथद्वारातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीपी जोशी यांचा पराभव, भाजपचे विश्वराज सिंह मेवाड विजयी!

महाराणा प्रताप यांचे वंशज आणि भाजपचे उमेदवार विश्वराज सिंह मेवाड यांची पहिलीच निवडणूक

राजस्थान;नाथद्वारातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीपी जोशी यांचा पराभव, भाजपचे विश्वराज सिंह मेवाड विजयी!

लोकसभा निवणुकीच्या चार राज्यांपैकी तीन राज्यात भाजपने विजय मिळविला.मध्यप्रदेशात १६६, राजस्थानमध्ये १४४,आणि छत्तीसगढमध्ये ५३ जागांवर विजय मिळविला.मात्र सर्वांच्या नजरा राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा जागेवर होत्या.कारण या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीपी जोशी येथून निवडणूक रिंगणात होते. तर त्यांच्यासमोर भाजपचे महाराणा प्रताप यांचे वंशज विश्वराज सिंह मेवाड निवणुकीच्या मैदानात उतरले होते.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नाथद्वारा हा सर्वाधिकचर्चेचा विषय ठरला होता. मात्र, या निवडणुकीत विश्वराज सिंह यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीपी जोशी याना धूळ चारत विजय मिळविला.मेवाडच्या माजी राजघराण्याचे सदस्य असलेले भाजपचे उमेदवार विश्वराज सिंह मेवाड यांनी राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा विधानसभेची जागा जिंकली आहे. या जागेवर काँग्रेसचे उमेदवार सीपी जोशी यांचा पराभव झाला आहे.

हे ही वाचा:

नेदरलँड्सचे ट्रम्प

घर-घर मोदी आता मन-मन मे मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे वक्तव्य!

निवडणूक निकालानंतर इंडी आघाडीची बैठक!

मध्यप्रदेशमध्ये लाडली योजनेचा प्रभाव

विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी हे नाथद्वारातून ५ वेळा आमदार राहिले आहेत. राजस्थानच्या निवडणूक इतिहासातील सर्वात रोमांचक लढत येथे २००८ साली पाहायला मिळाली होती. तेव्हा सीपी जोशी यांना अवघ्या १ मताने पराभव स्वीकारावा लागला. २००८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कल्याण सिंह यांनी जोशी यांचा एका मताने पराभव केला होता.त्यावेळी कल्याण सिंह यांना ६२,२१६ तर सीपी जोशी यांना ६२,२१५ मते मिळाली होती.

उल्लेखनीय म्हणजे सीपी जोशी दीर्घकाळापासून नाथद्वारा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे त्यांना या जागेवर सर्वाधिक अनुभव आहे. मात्र, विश्वराज सिंह यांची ही पहिलीच निवडणूक असून ते विजयी झाले आहेत.दरम्यान, १९ व्या फेरीनंतर, सीपी जोशी याना ८२६०३ मते मिळाली तर विश्वराज सिंह मेवाड याना ९०६१२ मते मिळाली.

 

Exit mobile version