मुंबई महापालिका आयुक्तपदी भूषण गगराणी यांची निवड!

१९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी

मुंबई महापालिका आयुक्तपदी भूषण गगराणी यांची निवड!

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची निवड करण्यात आली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार देशभरात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.त्यानुसार इक्बाल सिंह चहल यांना मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन हटवण्यात आलं होतं.इक्बाल सिंह चहल यांना हटवल्यानंतर राज्य सरकारने भूषण गगराणी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी निवड केली आहे.

भूषण गगराणी हे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय गगराणी यांनी नगरविकास, जलसंपदा आणि मराठी भाषा या विभागांची जबाबदारी देखील पार पडली आहे.

हे ही वाचा:

आरोपी साजिदची आई म्हणाली, एन्काउंटरमध्ये मुलाच्या मृत्यूचे दु:ख नाही!

नेमकं काय भोवलं ? राजकीय असंग की मनसुखच्या पत्नीचे शाप?

तुम्ही उतरलात तरी घडायचे तेच घडणार !

पोल बाँड्सने राजकारणातील काळा पैसा संपवला

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ.अमित सैनी यांची निवड करण्यात आली.आज (२० मार्च २०२४) सकाळी डॉ.अमित सैनी यांनीं आपला पदभार स्वीकारला.आश्विनी भिडे यांच्याकडून डॉ. सैनी यांनी हा पदभार स्वीकारला आहे.तसेच ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची बदली मुंबई महापालिकेत करण्यात आली आहे.अभिजीत बांगर यांच्या बदली नंतर त्यांच्या जागी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौरभ राव हे आता ठाणे महापालिकेचे आयुक्त म्हणून कारभार पाहणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी कैलाश शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. जळगावच्या जिल्हाधिकारीपदी शुभम गुप्ता, तर धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून विशाल नरवडे यांची बदली करण्यात आली आहे. बुलढाण्याच्या जिल्हाधिकारीपदी अंकित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांना देखील पदावरून हटवले आहे.नागपूरच्या NMRDA च्या आयुक्तपदावरून मनोजकुमार सुर्यवंशी यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी संजय मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version