६८व्या वर्षी प्रख्यात वकील हरीश साळवे तिसऱ्या विवाहबंधनात

लंडनमध्ये झाला दिमाखात विवाहसोहळा

६८व्या वर्षी प्रख्यात वकील हरीश साळवे तिसऱ्या विवाहबंधनात

प्रख्यात वकील हरीश साळवे यांनी वयाच्या ६८व्या वर्षी विवाह केला असून त्रीना नावाच्या महिलेशी ते विवाहबद्ध झाले आहेत. हा त्यांचा तिसरा विवाह आहे. हरीश साळवे यांची पहिली पत्नी मीनाक्षी यांना साक्षी व सानिया या दोन मुली आहेत. पण २०२०मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता ते तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत.

 

 

लंडनमध्ये साळवे राहतात आणि तिथेच त्यांचा हा विवाह पार पडला. त्यासाठी विविध क्षेत्रातील नामांकित लोक उपस्थित होते. त्यात नीता अंबानी, ललित मोदी यांचा समावेश होता. साळवे यांचा पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला असून त्यांनी आतापर्यंत बॉलीवूड स्टार सलमान खान, मुकेश अंबानी यांचे खटले हाताळले आहेत.

 

 

या विवाहाचे व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यात हरीश साळवे त्यांच्या तिसऱ्या पत्नीसह चालताना दिसत आहेत. शिवाय, त्यात विविध क्षेत्रातील ज्या नामांकित व्यक्ती सहभागी झाल्या आहेत, त्यांची छाचायित्रेही त्यात आहेत. साळवे यांनी पहिल्या पत्नीशी काडीमोड घेतल्यानंतर ब्रिटिश कलाकार कॅरोलिन ब्रोसार्डशी विवाह केला होता आणि २०२०मध्ये ते विवाहबद्ध झाले होते.

हे ही वाचा:

ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक श्रावण गिरी यांचे अपघाती निधन

आनंद साजरा करण्यासाठी बुमराह परतला मायदेशी

गुलाम नबी आझाद यांच्या समावेशामुळे काँग्रेसचा तीळपापड

अदानी-अंबानींना लक्ष्य करून देशाची घडी विस्कटण्याचा प्रयत्न

 

हरीश साळवे यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यात वकील म्हणून काम केलेले आहे. त्यात पाकिस्तानात बंदीवासात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या खटल्याचाही समावेश आहे. सलमान खानच्या हिट अँड रन केसमध्येही ते वकील म्हणून उभे राहिले आहेत. आयटीसीसारख्या मोठ्या उद्योगसमुहासाठीही त्यांनी वकील म्हणून काम केलेले आहे.

 

१९९९ ते २००२ या कालावधीत ते भारताचे सॉलिसिटर जनरलही राहिलेले आहेत. जानेवारी महिन्यात त्यांना वेल्स आणि इंग्लंडमध्ये महाराणी व्हिक्टोरिया यांचे सल्लागार म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. नागपूर विद्यापीठातून त्यांनी एलएलबीची पदवी प्राप्त केली आणि १९९२मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयात ते वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त झाले.

Exit mobile version