सेंगोल हे ब्रिटिशाने भारताला केलेल्या सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक होते, या दाव्याला काँग्रेसने विरोध केला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूमधील पुजाऱ्यांकडून हा सेंगोल स्वीकारताना या महान प्रतीकाला केवळ चालण्यासाठी वापरली जाणारी काठी म्हणून प्रदर्शनात ठेवण्यात आल्याबद्दल टीका केली. हा ऐतिहासिक सेंगोल आज, रविवारी संसदेच्या नवीन इमारतीत स्थापित केला गेला. सेंगोल लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ ठेवण्यात आला आहे. पंतप्रधानांनी शनिवारी नवी दिल्लीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी पुरोहितांची भेट घेतली होती.
पुरोहितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘तमिळ लोकांच्या मनात नेहमीच भारत मातेच्या सेवेची आणि भारताच्या कल्याणाची भावना राहिली आहे,’ असे सांगताना त्यांनी सेंगोलचे महत्त्व विशद केले. ‘जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची वेळ आली तेव्हा सत्ता हस्तांतरणाच्या चिन्हाबाबत प्रश्न निर्माण झाला. यासाठी आपल्या देशात वेगवेगळ्या परंपरा आहेत. वेगवेगळ्या प्रथा आहेत. परंतु यावेळी राजाजी आणि मुख्य पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आमच्या प्राचीन तमिळ संस्कृतीतून एक चांगला मार्ग सापडला. सत्ता हस्तांतरणाचा हा मार्ग होता – सेंगोलद्वारे. १९४७मध्ये, सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून, पवित्र तिरुवदुथुराई अधिनम (मुख्य पुजारी) यांनी एक विशेष सेंगोल तयार केला होता, असे पंतप्रधान म्हणाले.
“अधिनम यांच्या सेंगोलने भारताला शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या प्रत्येक प्रतीकातून मुक्त करण्यास सुरुवात केली. आता तेच सेंगोल, जे भारताच्या महान परंपरेचे प्रतीक आहे, ते नवीन संसद भवनात स्थापित केले जाईल,” असे मोदी म्हणाले, “शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतरही, तामिळनाडूची संस्कृती अजूनही जिवंत आणि समृद्ध आहे. अधिनमच्या महान दैवी परंपरेचा त्यात मोठा वाटा आहे,’ असेही कौतुक त्यांनी केले.सेंगोल बसवण्याच्या निर्णयामुळे देशात राजकीय वावटळ निर्माण झाले असून, राजदंड हे ब्रिटिशांकडून सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक असल्याच्या भाजपच्या दाव्याला काँग्रेसने विरोध केला आहे.
हे ही वाचा:
विरोधकांना आझादांनी दाखविला आरसा
पंतप्रधान आज नव्या संसद भवनाचे करणार लोकार्पण
पीएफआयवरील बंदीच्या रागातून गडकरींना केले ‘टार्गेट’
असा झाला मंत्रोच्चारांच्या निनादात दिमाखदार सेंगोल प्रतिष्ठापना सोहळा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, लॉर्ड माउंटबॅटन, सी. राजगोपालाचारी आणि जवाहरलाल नेहरू यांनी सेंगोलचे वर्णन इंग्रजांनी भारतात केल्याची सत्ता हस्तांतरित केल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा नाही. पक्षाचे नाव न घेता, पंतप्रधानांनी काँग्रेसवर तोफा डागल्या. त्यांनी प्रयागराजच्या ‘आनंद भवना’चा उल्लेख केला. ‘आनंद भवन’ जे आता एक संग्रहालय आहे, हे नेहरू कुटुंबाचे निवासस्थान होते. ते १९७०मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारत सरकारला दान केले होते. ‘मला आनंद होत आहे की, भारताच्या महान परंपरेचे प्रतीक, सेंगोल, नवीन संसद भवनात स्थापित केले जाईल.
हे आपल्याला सतत आठवण करून देत राहील की आपल्याला कर्तव्याच्या मार्गावर चालायचे आहे आणि जनतेला उत्तरदायी राहायचे आहे – स्वातंत्र्यानंतर पवित्र सेंगोलला त्याचा योग्य सन्मान आणि सन्माननीय स्थान दिले गेले असते तर बरे झाले असते. पण ती प्रयागराज येथील आनंद भवनात केवळ चालण्यासाठी वापरली जाणारी काठी म्हणून प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. तुमचे ‘सेवक’ आणि आमच्या सरकारने सेंगोलला आनंद भवनातून बाहेर काढले आहे,’ असे ते म्हणाले.