चिपळुणात ज्यादाच्या एनडीआरएफच्या तुकड्या पाठवा

चिपळुणात ज्यादाच्या एनडीआरएफच्या तुकड्या पाठवा

काळ रात्रीपासून कोकणात पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या या तडाख्याने कोकणातील अनेक हावे ही पाण्याखाली गेली आहेत. याचा सर्वाधिक फटका हा चिपळूणला बसला आहे. जलमय झालेल्या चिपळूणमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी एनडीआरएफ अर्थात केंद्रीय बचाव पथकाच्या अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात याव्यात अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ.विनय सहस्रबुद्धे आणि आमदार आशिष शेलार यांनी यासंबंधी केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय भल्ला यांची भेट घेतली आहे.

बुधवार रात्रीपासून सततच्या कोसळणाऱ्या पावसाने कोकणाला झोडपून काढले आहे. खेड, चिपळूण, महाड अश्या सर्वच भागांमध्ये रस्ते जलमय झाल्याचे चित्र आहे. चिपळूणला या पावसाचा सर्वाधीक फटका बसला आहे. चिपळूणमधील पाण्यात इमातरींचे तळ मजले पाण्याखाली गेले असून पहिला मजला पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे. या सर्व परीस्ठीच्या अनुषंगाने कोकणात एनडीआरएफच्या माध्यमातून बचावकार्य सुरु झाले आहे. पाण्यात अडकलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी एनडीआरएफचे जवान कार्यरत आहेत.

हे ही वाचा:

चिपळुणात पूरपरिस्थिती, कोकणात हाहाकार

दैनिक भास्कर समूहावर आयकर विभागाचे छापे

चीनमध्ये पुरामुळे २५ पेक्षा जास्त मृत्यू

कोविडमुळे अर्धमेले झालेलो…जलप्रलयाने सुपडा साफ झाला

पण कोकणातील स्थिती लक्षात घेता अधिकच्या एनडीआरएफ तुकड्या पाठवण्यात याव्यात अशी मागणी भाजपातर्फ़े करण्यात आली आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी या संदर्भात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय भल्ला यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत या संदर्भातील माहिती दिली.

तर आमदार आशिष शेलार यांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. तर या पावसाचा इशारा आधीच देण्यात आला होता. त्यानुसार सरकारने काही कार्यवाही केली का हे काळानुसार कळेल पण सध्यातरी ते होताना दिसत नाहीये असे शेलार म्हणाले. तर आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात भाजपाचे पथक शक्य त्या प्राथमिक सहकार्यासाठी पोहोचणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

Exit mobile version