27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Google News Follow

Related

शासनाच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून आजपर्यंत राज्यात एक लाख १० हजार प्रशिक्षणार्थांना प्रशिक्षणासाठी रुजु होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी ६० हजाराहून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमधे प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. या योजनेमार्फत १० लाख युवकांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री लोढा म्हणाले की, भविष्यातील रोजगाराची आव्हाने ओळखून आजच कार्य प्रशिक्षण देऊन, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविणारी, ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ ही राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेमध्ये सरकारी तसेच खासगी आस्थापनांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. अधिकाधिक युवकांना प्रशिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या योजनेंतर्गत सहभागी होण्यासाठी ८ हजार १७० आस्थापनांनी नोंदणी केली आहे. तसेच २ लाख २१ हजार २४४ प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेली आहे.

हेही वाचा..

पश्चिम बंगाल: विशेष अधिवेशनात मांडणार विधेयक; बलात्काराच्या दोषींना १० दिवसांत फाशी

मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी

राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समृद्ध, आनंदी होऊ दे

हरयाणातले जेजेपी आमदार देवेंद्र सिंह बबली यांचा भाजपमध्ये प्रवेश !

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. या योजनेला फक्त शहरी विभागातच नाही तर ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागवार या योजनेचा आढावा घेताना छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर अमरावती विभागाने यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. जिल्हावार विचार करता धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पाच हजार युवा रुजू झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या युवांना डीबीटीद्वारे विद्यावेतन १० सप्टेंबरपर्यंत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर मिळणार आहे, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

या योजनेतून महाराष्ट्रातील युवकांना फक्त रोजगारच मिळणार नसून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ सहज उपलब्ध होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. ही योजना वर्षभर सुरु राहणार असून या योजनेमार्फत १० लाख युवकांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वसमावेशक अशी ही योजना शासनाने युवकांसाठी आणली असून युवकांनी आणि उद्योगांनी देखील याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा