सालाबादप्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. यावेळी कर्णधार हार्दिक पंड्याला फलंदाजी, गोलंदाजी आणि कर्णधारपदावरून मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागत आहे. मात्र या कठीण काळात भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हार्दिकच्या मदतीला धाऊन आला आहे. सेहवागने रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही बोट दाखवले आहे.
सेहगाव टीकाकारांना काय म्हणाला?
सेहवागने टीकाकारांना आठवण करून दिली की, रोहित शर्मादेखील गेल्या तीन मोसमात कर्णधार म्हणून काही विशेष करू शकला नाही. त्याने ना धावा केल्या ना आयपीएल ट्रॉफी जिंकली.
जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबईच्या पराभवानंतर सेहवागला विचारण्यात आले की, हार्दिकवर दबाव वाढत आहे का? कारण त्याला फक्त १० धावाच करता आल्या आणि गोलंदाजीतही २ षटकात २१ धावा गमावल्या.
या प्रश्नावर सेहवाग म्हणाला की, हार्दिकला इतके दडपण घेण्याची गरज नाही. मुंबई यापूर्वीही अशा परिस्थितीतून गेली आहे. २०२१ आणि २०२२ मध्येही हा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नाही. सेहवाग म्हणाला की, गेल्या तीन मोसमात रोहित शर्मा कर्णधार होता, पण धावा करू शकला नाही आणि ट्रॉफीही जिंकू शकलेला नाही.
हेही वाचा :
दारूची तस्करी करणाऱ्या बोगस लष्करी अधिकाऱ्याला अटक
‘काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही
नोएडातील भंगार माफिया रवी काना, मैत्रीण काजल झा यांना थायलंडमधून अटक!
सेहवागने हार्दिकला दिला सल्ला
सेहवागने हार्दिकला फलंदाजी क्रमवारीत वर येणाचा सल्ला दिला. जेणेकरून त्याला अधिक चेंडू खेळण्याची आणि कामगिरी सुधारण्याची संधी मिळेल. हार्दिकची फलंदाजी सुधारली तर त्याची गोलंदाजी आणि कर्णधारपद आपोआप सुधारेल, असा सेहवागचा विश्वास आहे.
आयपीएल २०२४ मधील मुंबई इंडियन्सची कामगिरी
मुंबई इंडियन्सने या मोसमात आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि केवळ तीन सामने जिंकता आले. मुंबईचा निव्वळ रन रेट -०.२२७ आहे. मुंबई सध्या ६ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.