मध्य प्रदेशातील एका मुस्लीम महिलेने पतीच्या त्रासाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह हिंदू धर्म स्वीकारला आहे. हिंदू धर्मावर श्रद्धा व्यक्त करत महिलेने आपल्या दोन्ही मुलांचे नाव लव-कुश ठेवले आहे. आता ती मेहनाज नाहीतर मीनाक्षी म्हणून ओळखली जाणार आहे. सनातन परंपरेत महिलांचा आदर लक्षात घेवून मेहनाजने हिंदू धर्मात सामील झाल्याचे सांगितले आहे.
मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातील धामणार गावातील ही घटना आहे. मेहनाजने आपल्या दोन मुलांसह मंदसौरमधील गायत्री मंदिरात आपले शुद्धीकरण करून हिंदू धर्म स्वीकारला. मेहनाजची मीनाक्षी झाल्यानंतर तिने सांगितले की, पती आणि त्याच्या कुटुंबियांकडून छळ केला जात असे. याबाबत माझ्या वडिलांना माहिती दिली असता तुमची कौटुंबिक समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. मी कंटाळले होते.
तिने पुढे सांगितले, सनातन धर्मात महिलांचा आदर केला जातो, असे युट्युबवर आणि इतर ठिकाणी ऐकले होते-पाहिले होते. कुटुंबात महिलांना मान आहे. त्यामुळे मी प्रभावित होवून हिंदू संघटनेच्या लोकांशी संपर्क साधून सनातन धर्म स्वीकारला.
हे ही वाचा :
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण
अटल सेतूवरून उडीमारून बँकरची आत्महत्या !
बेकायदेशीर मशिदीचा प्रश्न विचारला म्हणून काँग्रेसच्या आमदारावर सहकारी आमदार भडकले!
सरकारी जमिनीवर बंगले, राजस्थानचा गुंड हजरतच्या घरावर बुलडोझर !
बुधवारी (४ सप्टेंबर) सायंकाळी उशिरा सुमारे दीड तास चालेल्या मंत्रोच्चारानंतर तिघांनी नामस्मरण केले. यावेळी गायत्री मंदिरात महिला आणि तिच्या दोन मुलांना दुध, दही, मध, गंगाजल, शेण आणि गोमुत्राने स्नान घालण्यात आले. दोन्ही मुलांनी आईसह विधीनुसार पूजा आणि आरती करून सनातन धर्म स्वीकारला. हिंदू युवा वाहिनीचे राज्य प्रभारी चैतन्य सिंह राजपूत यांनी सांगितले की, दोन तीन महिन्यांपूर्वी मेहनाजने हिंदू धर्मात प्रवेशासाठी संपर्क साधला होता. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर तिघांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे.