सनातन धर्मावर गरळ ओकणाऱ्यांनो जर्मन मुलीच्या डोळ्यातून भारत पाहा!

सनातन धर्मावर गरळ ओकणाऱ्यांनो जर्मन मुलीच्या डोळ्यातून भारत पाहा!

भारतीय संस्कृती, हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील परंपरा किती महान आणि अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत, याची प्रचिती आपल्याला नेहमी येत असते. म्हणूनच कि काय आपली संस्कृती हि जगभरात महान मानली जाते. मात्र आपल्याच देशातील काही महाभागांना आपल्याच संस्कृतीचं, धर्माचं आणि परंपरेचं वावडं असत. कधी धर्माला नाव ठेवायची, परंपरा योग्य नाहीत असं म्हणायचं आणि आपण धर्मनिरपेक्ष असल्याचं जगाला दाखवून द्यायचं. याची जणू आपल्या देशात स्पर्धाच लागली आहे. धर्माची भाषा केली कि आपल्या देशात ती व्यक्ती धर्मांध होते. पण आपल्याच देशातील धार्मिक परंपरा, धर्म ग्रंथाचं, संस्कृतीच अध्ययन आज जगभरातील अनेक देशांमधून होत आहे. अर्थात हा आपल्यासाठी सुखद अनुभव आहे. भारताचा मोठेपणा आज जगाला कळतो आहे. पण मानसिक खुजेपणा असलेल्या आपल्याच लोकांना याचे महत्व अजून कळालेलं नाही याच आश्यर्य वाटत.

आज हे सांगायचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा १०५ वा मन कि बात हा कार्यक्रम. या कार्यक्रमात त्यांनी अशा एका विषयाला हात घातला कि त्याचे हे भाषण किंवा हा विषय ऐकणारे आश्यर्यचकित झाले. त्यांनी मन कि बात मधून जर्मनीच्या एका २१ वर्षीय गायिका असलेल्या कैसमी या तरुणीच कौतुक केलं. मूळची जर्मनीची असलेली एक मुलगी कि जन्मापासून दृष्टीहीन आहे. आणि तिला भारताबद्दल, हिंदू धर्म, संस्कृतीबद्दल इतके आकर्षण, प्रेम आहे कि तिने अत्यंत मधुर आवाजात हिंदू धर्मातील देव देवतांची स्तुती करणारी स्तोत्र, गाणी तिने गेली आहेत. भारतातील वेगवेगळ्या राज्यांच्या असलेल्या स्थानिक भाषेतही तिने गाणी गायली आहेत. संस्कृत, हिंदी, मल्याळम, तामिळ, कन्नड, आसामी, बंगाली, मराठी, उर्दू या सर्व भाषांमध्ये तिने आपले सूर आजमावले आहेत. तिचं गायन ऐकल्यानंतर कोणालाही विश्वास बसणार नाही कि हे गायन एका जर्मनीच्या गायिकेचे आहे.

कधीही भारतात न आलेल्या, भारताबद्दल कसलीही माहिती नसणाऱ्या एका अंध मुलीन केलेले गायन अचंबित करणारं आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन कि बात या कार्यक्रमात तिच्या या उपक्रमाची दखल घेतली. तिला जगभरातील इतके देश असताना भारतीय संस्कृती, हिंदू धर्म या बद्दल का आकर्षण वाटावं ? यातच तिला का रुची निर्माण व्हावी यामागे काय कारणं असतील ? हा खरा महत्वाचा विषय आहे. ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल ? हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात. ज्याप्रमाणे मनामध्ये विचार येतात त्याप्रमाणे विद्युतशक्ती निर्माण होऊन स्तोत्रांमधले शब्दसुद्धा विचाराने भारलेले असल्यामुळे स्तोत्र म्हणणाऱ्याच्या मनावर त्या शब्दसमूहांचा खूप चांगला परिणाम घडतो. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण रामरक्षा या स्तोत्राकड पाहू शकतो. मंत्रशास्त्राच्या दृष्टीने ‘राम’ या शब्दाला विशेष महत्त्व आहे. ‘र’काराला मंत्रशास्त्रात ‘अग्नीबीज’ मानतात. ‘र’ काराच्या उच्चाराने आपल्या शरीरातल्या विद्युतशक्ती जास्त प्रमाणात सुरू होते व त्यामुळे आपल्या शरीरात विद्युतप्रवाह सुरू होतो. ‘र’काराची शक्ती अतिशय वेगवान असते हा प्रयोग कोणीही करून पाहण्यासारखा आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.

याचा अर्थ असा कि आपल्याकडील स्तोत्र हि त्यावेळी ऋषी मुनींना वेळ जायला साधन नाही म्हणून बनवली असं नाही. तर त्याला अर्थ आहे. आणि हे विज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे. जगभरात यावर संशोधन झालं आहे. त्यामुळंच जर्मनीच्या या कैसमीला आपल्या धार्मिक स्तोत्र आणि संगीतामध्ये रुची निर्माण झाली असणार यात माझ्या सारख्याच्या मनात कसलीही शंका नाही. तेव्हा आपला धर्म, संस्कृती इतकी महान आहे कि त्याबद्दल अभिमानच असायला हवा. काही प्रथा ज्या योग्य नव्हत्या त्यावर आपल्याच संतांनी प्रहार केले आहेत. त्या बंद केल्या आहेत. पण जी संस्कृती जगाला हेवा वाटावी अशी आहे, ती अधिक मजबूत कशी होईल, त्याचा प्रचार, प्रसार कसा होईल याची जबाबदारी आपलीच आहे. जर्मनीच्या एका अंध तरुणीने हिंदू धर्मातील स्तोत्रानचे गायन करून हिंदू धर्माची, भारतीय संस्कृतीची म्हणता जगापुढं ठेवली आहे, असं म्हणावं वाटत.

भारतीय संस्कृतीचं, हिंदू धर्माची सर्वत्र वावहा होत असतांना आपल्याच देशातील तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांचे चिरंजीव उदयनीधी स्टालिन हिंदू धर्माची तुलना मलेरिया डेंग्यू बरोबर केली. ए राजा यांनी हिंदू धर्माची तुलना एचआयव्ही बरोबर केली. आज जगभरात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जात असतात तेव्हा आपण पाहतो कि त्या त्या देशांचे प्रमुख हे दोन्ही हात जोडून सप्रेम नमस्कार करतात. नमसाकारची हि पद्धत भारतीयच आहे. एवढंच नाही तर मध्यंतरी पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानाणी नरेंद्र मोदी यांचे चरणस्पर्श केले. अमेरिकेची गायिका मेरी मीलीबेन हिनेहि अशाच पद्धतीने नमसकार केला होता. आज जगातील लोक भारतीय संस्कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आपल्याकडे केवळ नरेंद्र मोदी यांनी संस्कृतीला चालना देणारा एखादा विषय मांडला कि त्यावर गळे काढले जातात. निवडणुका आल्या कि मात्र मंदिरांमध्ये जाणे , उत्सवात सहभागी होणं हे करता येत आणि एरवी हिंदू धर्म आणि परंपरेला दूषण द्यायचं काम केल जात. जर्मनीच्या कैसमी या अंध तरुणीनं अशाच प्रकारे हिंदू धर्मातील स्तोत्र, गाणी गावून अशा लोकांना चपराक दिली, म्हणूनच नरेंद्र मोदी यांनी तिच जाहीर कौतुक केल आहे.

Exit mobile version