नाट्यगृहांच्या सुरक्षेसाठी पालिकेचे नवे ‘खासगी’ नाटक

नाट्यगृहांच्या सुरक्षेसाठी पालिकेचे नवे ‘खासगी’ नाटक

मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणारे नाट्यगृहांसाठी मुंबई महानगरपालिकेकडे स्वतःचा स्वतंत्र असा सुरक्षा विभाग आहे. असे असतानाही पालिका मात्र बाहेरील एजन्सी मधून सुरक्षा रक्षकांची भरती करत आहे. मुंबई महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या प्रबोधनकार ठाकरे आणि विलेपार्ले येतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह यांच्या सुरक्षतेवर खासगी कंत्राटदारावर पालिकेकडून महिन्याला ५ लाखांची उधळपट्टी करण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सुरक्षा यंत्रणेवर महिना सुमारे १ लाख १५ हजारांचा खर्च करण्यात येतो. महापालिकेच्या सुरक्षा विभागात सध्याच्या घडीला १७६३ रिक्त पदे आहेत. परंतु ही पदे भरण्यापेक्षा खासगी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात पालिकेला धन्यता वाटते.

मुंबई महापालिकेकडे स्वतंत्र असा सुरक्षा विभाग असताना बाहेरील कंत्राटदाराला नेमून का सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. भांडुप संकुल येथील पोलीस भरतीच्या धर्तीवर ट्रेनिंग देऊन सुरक्षा रक्षकांची भरती केली जाते. अशी सक्षम व्यवस्था महापालिकेकडे आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून महापालिका मुख्यालयासह विभाग कार्यालय, रुग्णालये यांच्या सुरक्षेसाठी मात्र खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात येत आहेत. त्याचबरोबरीने पालिका सुरक्षा व्यवस्था ही खासगीकरणाकडे एक एक पाऊल टाकत आहे हे आता स्पष्टपणे निदर्शनास येत आहे. सध्याच्या घडीला पालिकेच्या सुरक्षा विभागात भरती प्रक्रिया थंडावलेली आहे.

 

हे ही वाचा:

व्वा रे व्वा! गरब्याला नियमांच्या साखळ्या घालून विचारांचे सोने मात्र लुटणार

…आणि असा घातला त्याने मित्रालाच गंडा

फसवणुकीनंतर पैसे मिळाले; पण सायबर चोरटे फरार

अमेरिकेच्या उप परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यात या महत्त्वाच्या विषयावर करणार चर्चा

 

पूर्वी नाट्यगृहांबाहेरील सुरक्षेची पूर्णपणे जबाबदारी ही पालिकेच्या सुरक्षा विभागाकडून उजलली जायची. आता मात्र खासगी सुरक्षारक्षकांच्या हातात नाट्यगृहांची जबाबदारी देण्यात येत आहे. त्यामुळे पैशांचाही चांगलाच अपव्यय होत आहे.

Exit mobile version