उत्तर प्रदेशमधील अयोध्येत २२ जानेवारी रोजी न भुतोनभविष्यती असा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. २२ जानेवारीला होणारा हा भव्य दिव्या सोहळा आणि लगेचच येणारा प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) लक्षात घेऊन उत्तर प्रदेशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अयोध्येला सध्या छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
राम मंदिरात होणाऱ्या सोहळ्याला अनेक प्रतिष्ठित आणि दिग्गज मान्यवरांची हजेरी असणार आहे त्यामुळे सुरक्षेत कुठलीही कुचराई होऊ नये यासाठी पोलिसांचा सर्वत्र बंदोबस्त आहे. याशिवाय एटीएस कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी तयारी पूर्ण झाली आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी अयोध्येला सशक्त सुरक्षा कठडे लावण्यात येणार आहेत. अयोध्येतील लता मंगेशकर चौकात उत्तर प्रदेशचे दहशतवादविरोधी पथक तैनात करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी ३६० डिग्री सुरक्षा कव्हरेज प्रदान करण्यासाठी अँटी-माइन ड्रोन देखील तैनात केले आहेत.
हे ही वाचा:
शेअर बाजाराच्या निर्देशांकात लक्षणीय घट
नरेंद्र मोदींच्या गावात सापडले २८०० वर्षे जुने मानवी वसाहतीचे अवशेष
दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार
पंतप्रधान मोदींनी शेअर केला लतादीदींचा शेवटचा श्लोक
उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील दहशतवादी कारवायांचा सामना करण्यासाठी २००७ मध्ये दहशतवादविरोधी पथकाची स्थापना केली होती. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक २००७ पासून कार्यरत आहे ते उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष युनिट म्हणून काम करते. एटीएसचे मुख्यालय राजधानी लखनौ येथे आहे. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फील्ड युनिट्स देखील तयार करण्यात आल्या आहेत, जिथे ऑपरेशनल एटीएस कमांडोजच्या अनेक तुकड्या आहेत.