छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाने ८ नक्षलवादी टिपले, एक जवान हुतात्मा!

दोन जवान जखमी, चकमक अजूनही सुरु

छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाने ८ नक्षलवादी टिपले, एक जवान हुतात्मा!

छत्तीसगढच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आठ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहेत.या चकमकीत एका जवानाला वीरगती प्राप्त झाली आहे आणि दोन जवान जखमी झाले आहेत.नारायणपूरच्या अबूझमाड़ जंगलात ही चकमक झाली असून अजूनही सुरूच आहे.

नारायणपूरमधील अबूझमाड़च्या जंगलात नक्षलवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीवरून सुरक्षा दलाने कारवाई केली.सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरु आहे.

हे ही वाचा..

विवान कारुळकरच्या पुस्तकाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली दखल

‘तंत्रज्ञानातील मक्तेदारी संपवा’

प. बंगालमधील निवडणुकीनंतरचा हिंसाचार म्हणजे मृत्यूचे तांडव!

सुरत महानगरपालिकेच्या १३ मंदिरांना पाडण्याच्या नोटीसनंतर विहिंपकडून निदर्शनांचा इशारा!

मिळालेल्या माहितीनुसार, नारायणपूर जिल्ह्यातील माड येथे मागील दोन दिवसांपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.या संयुक्त कारवाईत नारायणपुर-कोंडागांव-कांकेर-दंतेवाड़ा डीआरजी, एसटीएफ आणि आईटीबीपी 53वी बटालियन दलांचा समावेश आहे.

Exit mobile version