कुपवाड्यातील छाप्यात सापडली चिनी बनावटीची दुर्बीण, मशिनगन, हॅन्डग्रेनेड!

भारतीय लष्कराची कारवाई

कुपवाड्यातील छाप्यात सापडली चिनी बनावटीची दुर्बीण, मशिनगन, हॅन्डग्रेनेड!

कुपवाडा पोलिस आणि भारतीय लष्कराच्या ४७RR ने कुपवाडा जिल्ह्यातील कांडी वनक्षेत्रात राबविलेल्या ‘शोध आणि नष्ट’ करण्याच्या मोहिमेदरम्यान (SADO) मोठ्या प्रमाणात युद्ध साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये ०१ मशीनगन, ०७ विविध प्रकारचे हँडग्रेनेड, ९० सुटे राउंड, एक चीनी बनावटीची दुर्बिणीचा समावेश आहे.

यासह दोन सोलर मोबाईल चार्जर आणि परदेशी बनावटीच्या स्लीपिंग बॅग्जसह कपडे आणि मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी बनावटीची औषधे यांचा समावेश आहे. या संदर्भात संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरुच आहे.

जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या कारवाईत एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत माहिती देताना बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, या कारवाईमुळे सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. घुसखोर आरएस पुरा सेक्टरमधील अब्दुलियन सीमा चौकीवर मारला गेला. प्रवक्त्याने सांगितले की, ‘४ आणि ५ एप्रिलच्या मध्यरात्री सतर्क बीएसएफ जवानांनी एका घुसखोराला आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडताना पाहिले आणि त्याला पुढे जाण्यापासून थांबवण्यास सांगितले.’

हे ही वाचा  : 

समन्स चुकवल्यानंतर कामराची एफआयआर रद्द करण्यासाठी धावाधाव

भोंग्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या सोमय्यांना धमकी; काय म्हणाले किरीट सोमय्या?

टॅरिफ वॉरमुळे शेअर बाजार गडगडला; जगात काय परिस्थिती?

कोलकाता: रामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या हिंदू भाविकांवर हल्ला

प्रवक्त्याने सांगितले की, सैनिकांनी दिलेल्या इशाऱ्याकडे घुसखोराने दुर्लक्ष केले आणि तो पुढे जात राहिला. ते म्हणाले, ‘बीएसएफ जवानांनी धोका ओळखला आणि घुसखोराला ठार केले.’ घुसखोराची ओळख पटवण्याचे आणि त्याच्या हेतू शोधला जात आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानने घुसखोराचा मृतदेह घेण्यासही नकार दिला. या घटनेबाबत पाकिस्तानी समकक्षाकडे तीव्र निषेध नोंदवला जात असल्याचे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले.

Exit mobile version