मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत. अजिंक्य नाईक यांनी विरोधक संजय नाईक यांचा पराभव केला आहे. अजिंक्य नाईक यांना २२१ मतं मिळाली आहेत. तर संजय नाईक यांना ११४ मतं मिळाली. अजिंक्य नाईक यांनी तब्बल १०७ मतांनी विजय मिळविला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे.
एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयांनतर अजिंक्य नाईक यांनी हा विजय अमोल काळे यांचा असल्याचं म्हटलं आहे. अमोल काळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी काल (२३ जुलै) निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीत अजिंक्य नाईक विजयी झाले तर संजय नाईक यांचा पराभव झाला.
हे ही वाचा:
प्रत्येक राज्याचे नाव अर्थसंकल्पात घेणे शक्य नसते हे काँग्रेसला कळत नाही?
यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; दिल्ली कोर्टाने पाठवले समन्स !
काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळले, १८ जणांचा मृत्यू !
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; एक जवान हुतात्मा
एमसीएच्या अध्यक्षपदासाठी किती मतदान झाले ?
काल एमसीएच्या अध्यक्षपदासाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया पार पडली आहे. एमसीएच्या एकूण ३७५ मतदारांपैकी ३३५ प्रतिनिधींनी मतदान केलं आहे.मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाकरता प्रतिष्ठेची झालेली निवडणूक प्रक्रिया एमसीएच्या मुख्यालयात पार पडली होती. अजिंक्य नाईक आणि संजय नाईक हे अध्यक्षपदाचा निवडणुकीत मैदानात उभे होते. अखेर या निवडणुकीत अजिंक्य नाईकांनी बाजी मारली आहे.