वानखेडेवर पडणार धावांचा पाऊस की वारुणराज फिरवणार सामन्यावर पाणी ?

वानखेडेवर पडणार धावांचा पाऊस की वारुणराज फिरवणार सामन्यावर पाणी ?

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना आज म्हणजेच शुक्रवार, ३ डिसेंबर पासून सुरू होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. पण मालिकेतील या महत्त्वाच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे वानखेडेच्या मैदानात धावांचा पाऊस पडणार की वरुण राज सामन्यावर पाणी फिरवणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिका सध्या दोन्ही देशांमध्ये खेळली जात आहे. एकूण दोन सामन्यांची ही कसोटी मालिका आहे. यापैकी पहिला सामना कानपूर येथे खेळला गेला असून हा सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळला जाणार आहे. हा दुसरा कसोटी सामना मालिकेतील निर्णायक सामना ठरणार आहे. हा सामना जिंकून मालिकेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.

हे ही वाचा:

शेवडे यांनी मांडलेली विषवल्ली शहरात आहे, त्याचा मुकाबला करावा लागेल

मिर्झापूरच्या ललितचा मृतदेह आढळला

परमबीर अखेर निलंबित; भत्ते मिळणार पण अन्यत्र नोकरी करता येणार नाही

धक्कादायक!! मुलीचे अपहरण नव्हे तर आईनेच केली हत्या!

पण या सामन्यावर पावसाचे सावट दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. १ डिसेंबर आणि २ डिसेंबर हे दोन्ही दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पाहायला मिळाला. मुंबईतही पावसाची संततधार सुरुच होती हवामान खात्याच्या अंदाजानुसार चार तारखेपर्यंत हा पाऊस असाच राहू शकतो. त्यामुळे वानखेडे मैदानावरील कसोटी सामना होणार की नाही हा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय.

दरम्यान महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या नव्या कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचा परिणामही या सामन्यावर होताना दिसणार आहे. वानखेडे मैदानावरील या सामन्यासाठी प्रेक्षक मर्यादा कमी करण्यात आली आहे. मैदानाच्या एकूण क्षमतेच्या केवळ २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी असणार आहे.

Exit mobile version