शनिवार, १४ ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्याचा तिसरा दिवस पार पडला. या दिवसा अखेर इंग्लंड संघाचा डाव ३९१ धावांवर संपला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने केलेल्या नाबाद १८० धावांच्या जोरावर इंग्लंड संघाने आपला डाव सावरला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना हा अनिर्णित राहण्याच्या दिशेने सरकताना दिसत आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या ३ बाद ११९ अशी होती. इंग्लंडचा कर्णधार जो रूट नाबाद ४८ धावा करून खेळपट्टीवर टिकून होता. तर जॉनी बेर्स्ट्रोव त्याला साथ देत होता. त्यानंतर सामन्याचा तिसरा दिवस सुरू झाला तेव्हा या दोघांनीच संघाचा खेळ सावरण्यास मदत केली. बेर्स्ट्रोवने ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर बटलर आणि मोईन अली हे दोघे रूटला पाहिजे तशी साथ देण्यास अपयशी ठरले. पण तरीदेखील कर्णधार जो रूट हा अखेरपर्यंत एकटा खिंड लढवत राहिला. शेवटी इंग्लंडचा डाव आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ एकत्र संपला.
हे ही वाचा:
भारताच्या ऑलिम्पिक चमूसोबत राष्ट्रपतींची ‘चाय पे चर्चा’
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
भारतातील चार पाणथळ ठिकाणांचा रामसर यादीत समावेश
फेलिक्सने दाखवून दिली प्रायोजकांना त्यांची ‘जागा’
सध्या सामन्यात इंग्लंड संघाने २७ धावांची आघाडी घेतली असून सामन्याचे दोन दिवस अजून बाकी आहेत. या सामन्यात भारताकडून मोहम्मद सिराज याने चार बळी टिपले असून इशांत शर्माने तीन गडी बाद केले आहेत. तर मोहम्मद शमीने दोघांना माघारी धाडले आहे.