सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोविड रुग्णसंख्येत घट

सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोविड रुग्णसंख्येत घट

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात साडेतीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात ३ लाख २९ हजार ९४२ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल ३ हजार ८७६ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. परवाच्या तुलनेत (३ लाख ६६ हजार १६१) नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने पुन्हा दिलासा मिळाला आहे.

गेले काही दिवस २४ तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. मात्र आता सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात भारतात ३ लाख २९ हजार ९४२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ८७६ रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात ३ लाख ५६ हजार ८२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ वर गेला आहे. आतापर्यंत २ लाख ४९ हजार ९९२ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आतापर्यंत देशात १ कोटी ९० लाख २७ हजार ३०४ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३७ लाख १५ हजार २२१ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

जी-२३ पुन्हा आक्रमक?

इस्राएल-पॅलेस्टाईन संघर्ष पुन्हा भडकला

तुमच्या मुलांना शाखेत पाठवा, देश वाचवा

मुस्लिम संघटनांसोबतची आघाडी काँग्रेसला भोवली

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या १७ कोटी २७ लाख १० हजार ६६ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version