स्पुतनिकची दुसरी खेप दाखल

स्पुतनिकची दुसरी खेप दाखल

भारतात लसीकरणाच्या मोहिमेत आता रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचा समावेश होणार आहे. नागरिक लवकरच रशियाच्या स्पुटनिक-व्ही लस दिली जाणार आहे. आज स्पुटनिक-व्ही लसची दुसरी खेप हैदराबादला आली आहे. यापूर्वी, १ मे रोजी लसींची पहिली खेप भारतात पोहोचली होती. १३ मे रोजी सेंट्रल ड्रग लॅबरोटरी काऊन्सिलने या लसीला मंजुरी दिली आहे. लस पुरवठा भारतीय उत्पादक भागीदारांकडून सुरू होईल.

पुढील आठवड्यापासून देशात स्पुटनिक व्ही लस देणे सुरू होऊ शकेल. जुलैपासून स्पुटनिक देशात उत्पादन सुरू करणार आहे. सध्या देशात लसीकरण मोहिमेमध्ये दोन लसी वापरल्या जात आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन वापरात आहेत. स्पुटनिक व्ही रशियाच्या गामालेया नॅशनल सेंटरने विकसित केले आहे.

रशियाचे भारतातील राजदूत निकोले कुडाशिव यांनी म्हटलं की, रशियन तज्ञांनी घोषणा केली की, कोविडच्या नव्या स्ट्रेनसाठी देखील ही लस प्रभावी आहे. या लसीची किंमत सध्या ९४८ रुपये प्रति डोस आणि ५ टक्के जीएसटी अशी आहे.

हे ही वाचा:

आता बँक बुडाली तरी ठेवीदारांना चिंता नाही, मोदी सरकारचा नवा नियम

ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला

मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक

अतुल्य भारताचा सन्मान करा, ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने मीडियाला सुनावले

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे सीईओ किरिल्ल दमित्रीएव यांनी सांगितलं की, स्पुटनिक-व्ही ही रशिया-भारताची एक लस आहे. त्याचा मोठा भाग भारतात तयार होईल. आम्हाला आशा आहे की यावर्षी भारतात स्पुटनिक-व्हीच्या ८५ कोटीहून अधिक लस तयार केल्या जातील. लवकरच भारतात स्पुटनिक-व्ही लाइट लस भारतात वापरली जाईल, अशी आशा आहे.

Exit mobile version