सेबीच्या प्रमुख माधबी पुरी- बुच यांना हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांमधून क्लीनचीट

माधबी पुरी फेब्रुवारी २०२५ पर्यंत सेबीच्या अध्यक्षपदी राहणार

सेबीच्या प्रमुख माधबी पुरी- बुच यांना हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांमधून क्लीनचीट

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीच्या प्रमुख माधबी पुरी- बुच यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माधबी बुच या आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, तपासादरम्यान त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. माधबी पुरी यांना हिंडेनबर्ग रिसर्च आणि काँग्रेस पक्षाने केलेल्या आरोपांमधून क्लीन चिट मिळाली आहे. आता पर्यंतच्या तपासात निधीचा गैरवापर, पदाचा गैरवापर असे कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत.

अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अध्यक्षा माधवी पुरी- बुच यांच्यावर अदानींच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फंडात गुंतवणूक केली होती, असे अहवालात म्हटले होते. या अहवालानंतर काँग्रेसनेही बुच यांच्यावर सेबीद्वारे नियमन केलेल्या कंपन्यांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपांच्या चर्चेदरम्यान सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू केली होती. एजन्सी आणि अर्थ मंत्रालय या दोन्ही संस्थांनी हा तपास केला. यामध्ये माधबी बुच आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

माधबी पुरी बुच यांच्यावर लावलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांच्या चौकशीत कोणताही आक्षेपार्ह पुरावा सापडला नाही, त्यामुळेच आता त्या आपला कार्यकाळ पूर्ण करू शकतात. माधबी पुरी फेब्रुवारी २०२५ पर्यंत सेबीच्या अध्यक्षपदी राहतील.

हे ही वाचा : 

क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचे वडील करत होते धर्मांतरण; खार जिमखान्याचे सदस्यत्व रद्द

पंजाब दहशतवादी कट प्रकरण: दोन खलिस्तानी दहशतवाद्यांच्या प्रमुख साथीदारावर आरोपपत्र दाखल

…म्हणे मंदिरातील लाऊडस्पीकरमुळे ध्वनिप्रदूषण वाढते!

बैरुतमध्ये रुग्णालयाखाली असलेल्या नसरल्लाच्या बंकरमध्ये कोट्यवधीची माया

अमेरिकन शॉर्ट- सेलर हिंडेनबर्ग रिसर्चसह काँग्रेसने माधबी आणि त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले होते. सेबी प्रमुखांचे अदानी समूहाशी आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा अहवालातून करण्यात आला होता. याप्रकरणी संसदीय लोकलेखा समितीने (पीएसी) सेबी अध्यक्षांची चौकशी केली. चौकशीत माधबी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात कोणताही पुरावा सापडला नाही, त्यामुळे त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.

Exit mobile version