झोमॅटोचा आता ‘शेअर्स’चा ऑप्शन

झोमॅटोचा आता ‘शेअर्स’चा ऑप्शन

झोमॅटो या फूड डिलिव्हरी करणाऱ्या प्रसिद्ध कंपनीच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओला सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने मान्यता दिली आहे. यामुळे आता झोमॅटो या कंपनीचे शेअर्स लवकरच खुल्या बाजारात येणार आहेत. झोमॅटोचा आयपीओ हा या वर्षातील काही महत्वाच्या आयपीओ पैकी एक आहे. साडे सात हजार कोटी रुपये किंमतीचा हा आयपीओ असल्याचे म्हटले जात आहे.

झोमॅटो ही भारतातील एक महत्वाची स्टार्ट अप कंपनी आहे ज्यामध्ये अनेक महत्वाच्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. ज्यामध्ये टायगर ग्लोबल मॅनेजमेंट, फिडेलिटी, इन्फो एज इंडिया या कंपन्यांची गुंतवणूक आहे. झोमॅटोमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक ही इन्फो एज कंपनीची आहे. या गुंतवणुकीची किंमत अंदाजे ७०० कोटी असल्याचे समजते.

हे ही वाचा:

डेन्मार्क, इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक

धर्मांतरानंतर दहशतवादी बनलेल्या मुलीसाठी आईचे केंद्राकडे साकडे

न्यूयॉर्क टाइम्सची जाहिरात: भारतात हवा मोदीविरोधी वार्ताहर

आंतरराष्ट्रीय कुबेर, वागळे आणि राऊत

झोमॅटोच्या येऊ घातलेल्या साडे सात हजार कोटींच्या आयपीओ मधून इन्फो एज कंपनी आपला वाटा विकणार असल्याची माहिती मिळत आहे. तर बाकीची रक्कम झोमॅटो कंपनी ही फ्रेश इशुच्या माध्यमातून उभे केले जाणार आहेत. या आयपीओ मधून उभ्या राहणाऱ्या गुंतवणुकीतून कंपनीची ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक वाढ केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Exit mobile version