25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषइंडिगो विमानात सीट गायब

इंडिगो विमानात सीट गायब

प्रवाशाने केली तक्रार, कंपनीकडून असमाधानकारक उत्तर

Google News Follow

Related

विमानांमध्ये प्रवाशांमध्ये वादविवादाच्या घटना नेहमीच घडत असतात. पुणे-नागपूर येथील इंडिगो कंपनीच्या विमानात मात्र वेगळ्याच घटनेमुळे वाद निर्माण झाला. 6E-6798 या विमानात सागरिका पटनायक या महिला बसण्यासाठी आपल्या आसनाजवळ पोहोचल्या पण तिथे ते आसनच नव्हते.

 

त्यांचे पती सुब्रत पटनायक यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, सागरिका यांनी जेव्हा तिथे आसन नसल्याचे लक्षात आल्यानंतर शोधाशोध केली आणि नंतर विमानातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली. पण त्याचवेळी इतर प्रवासी विमानात येत असल्यामुळे त्यांना काही काळ वाट पाहावी लागली. त्यामुळे इतर प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त आसन आणून सागरिका यांना बसण्याची संधी दिली.

 

सुब्रत यांनी एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली आणि ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर इंडिगोकडून सुब्रत यांना उत्तर देण्यात आले पण ते समाधानकारक नव्हते. इंडिगोने म्हटले होते की, हे पाहणे (आसन नसणे) नक्कीच भूषणावह नाही. वेल्क्रोपासून ते आसन वेगळे झाल्यामुळे इतरत्र पडले होते पण कर्मचाऱ्यांच्या मदतीने पुन्हा बसविण्यात आले. अर्थात तुमचे म्हणणे आमच्या संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहे. ते यावर विचार करतील. तुम्हाला भविष्यात योग्य सेवा देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.

हे ही वाचा:

व्याजाच्या रकमेसाठी घरात घुसून विधवा महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

हार्दिक पंड्याची घरवापसी; पुन्हा मुंबई इंडियन्सकडून खेळणार आयपीएल

‘१२ वी फेल’ सिनेमा ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत

अवकाळी पावसाच्या हजेरीने मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली

त्यावर सुब्रत यांनी उत्तर दिले की, तुम्ही मला प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण प्रवासी विमानात बसण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींची खातरजमा करणे योग्य ठरले नसते का? इंडिगोसारख्या कंपनीच्या प्रतिष्ठेला यामुळे धक्का बसतो.

 

विमानसेवा क्षेत्रातील तज्ज्ञ धैर्यशील वांदेकर यांनी याबाबत इंडिगोवर टीका केली आङे. विमान कंपनीने अशी तुटकीफुटकी सुविधा उपलब्ध करून देता कामा नये. नागरी विमानउड्डाण संचालनालयाने यासंदर्भात याआधीही विमान कंपन्यांना इशारा दिलेला आहे. यावेळीही तशी कारवाई केली गेली पाहिजे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा