‘इसीस, ब्राइड्स सर्च करा, मग प्रचीती येईल ‘द केरला स्टोरी’ मागच्या वास्तवाची’

अदा शर्माने दिला टीकाकारांना सल्ला

‘इसीस, ब्राइड्स सर्च करा, मग प्रचीती येईल ‘द केरला स्टोरी’ मागच्या वास्तवाची’

‘द केरला स्टोरी’ प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटात तुफान प्रतिसाद मिळत आहे पण त्याच्या सोबतच वादही कायम आहे. हा चित्रपट प्रचारकी असून चित्रपटाचं कथानककच सत्याशी काहीही संबंध नसल्याची टीका करण्यात येत आहे. या टीकेला चित्रपटाची मुख्य नायिका अदा शर्मा हिने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ISIS आणि ब्राइड्स हे दोन शब्द गुगलवर सर्च करा आणि आपला भारतीय चित्रपट खरा आहे याची प्रचिती येईल असा सल्ला अदा शर्माने टीकाकारांना दिला आहे.

‘आणि काही लोक ‘द केरला स्टोरी’ला अजूनही प्रचारकी चित्रपट असं म्हणत आहेत, अनेक भारतीय पीडितांकडून घटना ऐकूनही असं काही घडलंच नाही असं म्हणत आहेत.. त्यांना माझी नम्र विनंती आहे की गुगलवर फक्त दोन शब्द सर्च करावेत. इसिस आणि ब्राइड्स हे दोन शब्द गुगलवर सर्च करा, कदाचित गोऱ्या मुलींच्या अकाऊंटवर सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटतील आणि आपला भारतीय चित्रपट खरा आहे याची प्रचिती येईल’, असं ट्विट अडा शर्माने केले आहे .

‘या चित्रपटावर बंदी आणू शकत नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय. या चित्रपटात फक्त इसिस सोडून इतर काहीच चुकीचं दाखवलं गेलं नाही असं मला वाटतं. जर या देशातील सर्वांत जबाबदार व्यवस्था म्हणजेच उच्च न्यायालय चित्रपटाच्या बंदीच्या विरोधात असेल, तर ते योग्यच असतील. इसिस ही दहशतवादी संघटना आहे. फक्त मीच त्यांना दहशतवादी म्हणतेय असं नाही तर आपला देश, गृह मंत्रालय आणि इतर देशांनीही त्यांना दहशतवादी म्हटलंय. जर तुम्हाला ती दहशतवादी संघटना वाटत नसेल तर तुम्हीदेखील दहशतवादी आहात’, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना रनौतनेही दिली आहे.

हे ही वाचा:

खलिस्तान कमांडो फोर्सच्या प्रमुखाची लाहोरमध्ये गोळ्या घालून हत्या !

‘अजित पवारांचं वागण बघूनचं शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला’

६० कोटींच्या अनुदानाचा निर्णय ‘बेस्ट’ नाही !

‘द केरळ स्टोरी’ चित्रपट मध्यप्रदेशात टॅक्स फ्री; आता महाराष्ट्रातही मागणी !

‘द केरला स्टोरी’ चित्रपट प्रचारकी असल्याची टीका होत असतानाही हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. ‘द केरला स्टोरी’ने पहिल्या दिवशी ८ कोटी आणि दुसऱ्या दिवशी १२ कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाचे एकूण गल्ला २० कोटींवर गेला आहे आहे.

Exit mobile version