ओएनजीसी बार्ज: नौदलाचे शोध व बचावकार्य अजूनही सुरूच

ओएनजीसी बार्ज: नौदलाचे शोध व बचावकार्य अजूनही सुरूच

तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसल्याने समुद्रातील ओएनजीसीचा बार्ज भरकटला होता. त्यावरील खलाशांचे प्राण धोक्यात आले होते. त्यांनी पाठवलेल्या बचाव संदेशानंतर नौदलाने शोध आणि बचाव मोहिम जारी केली. या बार्जवरील ३७ जणांचा मृत्यु झाला आहे तर ३८ कर्मचारी बेपत्ता झाले आहेत.

ओएनजीसीच्या बार्ज पी-३०५ वर एकूण २६१ कर्मचारी होते. त्यापैकी १८६ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. ओएनजीसीसाठी काम करणारं बार्ज पी-३०५ तोक्ते चक्रीवादळामुळे भरकटलं होतं. यावर अनेक कर्मचारी काम करत होते. आतापर्यंत १८६ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तर ३७ मृतदेह हाती लागले आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातही चित्रीकरणाला परवानगी द्या

भारतीय महिला संघ खेळणार पहिली पिंक बॉल टेस्ट

दिल्ली ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रकरण: नवनीत कालरावर ईडीकडून देखील गुन्हा दाखल

भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा राहुल द्रविडकडे

नौदलाकडून शोध आणि बचावकार्य सुरुच

नौदलाचे बार्ज पी-३०५ वरील कर्मचाऱ्यांसाठी शोध आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे. भारतीय नौदल बार्ज पी-३०५ वरील बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे. ज्यांना वाचवलं आहे, त्यांना मुंबई बंदरात आणलं गेलं. आयएनएस कोलकातामधून बचावलेले कर्मचारी परतले आहेत. तर मृतदेह देखील याच युद्धनौकेतून मुंबईच्या बंदरावर आणले. यासोबतच आयएनएस कोची पुन्हा एका शोध आणि बचाव कार्यात सहभागी झाली आहे. भारतीय नौदल युद्धनौका, विमान आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे. तटरक्षक दलही या शोध मोहिमेत सहभागी झालं आहे. भारतीय नौदलाच्या आयएनएस कोलकाता आणि आयएनएस कोची सोबतच, आयएनएस बेटवा, आयएनएस बिआस, आयएनएस तेग, आयएनएस शिकारा या देखील या शोध मोहिमेत सहभागी झाल्या आहेत.

Exit mobile version