समुद्राकडून ६७ हजार किलो कचरा साभार परत

समुद्राकडून ६७ हजार किलो कचरा साभार परत

दोन दिवसांपूर्वी तौक्ते वादळाने मुंबईला चांगलेच झोडपले होते. या वादळामुळे समुद्राने देखील रौद्र रुप धारण केले होते. मोठ मोठ्या उंचीच्या लाटा मुंबईच्या किनाऱ्यावर धडकल्या होत्या. वादळ शमल्यानंतर समुद्रातील पाण्याची पातळी देखील पूर्ववत झाली, परंतु समुद्राने किनाऱ्यावर सुमारे ६७ हजार किलोग्रॅम कचरा परत सोडला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या विविध किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करायला सुरूवात केली होती. हा कचरा दोनच दिवसांपूर्वी म्हणजे १५ मे रोजी उचललेल्या कचऱ्यापेक्षा तब्बल ८७% जास्त आहे. यापैकी काही चौपाट्यांवर खूप मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला तर काही चौपाट्यांवर सामान्यांपेक्षा कमी कचरा गोळा झाला होता. दादर सारख्या चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात गोळा झाला होता, तर जुहू चौपाटीकर अपेक्षेपेक्षा कमी कचरा गोळा झाला. अनेकांच्या मते वाऱ्याच्या दिशेपेक्षा भरतीच्या दिशेचा कचरा गोळा होण्याच्या जागेवर परिणाम झाला असू शकतो.

हे ही वाचा:

मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, रासायनिक खतांच्या सबसिडीत १४०% वाढ

शेतकऱ्यांचे खरेखुरे मित्र पंतप्रधान मोदींचा खताबाबत शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई महापालिकेच्या विरोधात भाजपा सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार

मुख्यमंत्र्यांनी निदान मुंबईचा तरी दौरा करावा

हे नैऋत्य मान्सुन वारे नसल्यामुळे वाऱ्यांच्या दिशेपेक्षा भरतीच्या दिशेचा कचऱ्याच्या गोळा होण्यावर मोठा परिणाम झाला. शहरातील सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा खुली असल्याने रस्त्यावरील सर्व कचरा अखेरीस या यंत्रणेत जमा होतो. ही यंत्रणा शेवटी समुद्रात कचरा वाहून नेत असल्याने या कचऱ्याचा प्रवास अखेरीस समुद्रातच समाप्त होतो. त्यामुळे सध्या किनाऱ्यावर आलेला कचरा हा मुंबईकरांनीच समुद्राला अर्पण केलेला होता. या वादळाच्या निमित्ताने समुद्राने हा कचरा मुंबईकरांना साभार परत केला आहे.

Exit mobile version