पर्यावरणाबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्यांना सायकल ट्रॅक मात्र हवा

पर्यावरणाबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्यांना सायकल ट्रॅक मात्र हवा

एकीकडे पर्यावरणाबद्दल अश्रु ढाळायचे आणि दुसरीकडे पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प राबवायचे, असा प्रकार पवईत सुरू आहे.

पवई तलावाभोवती सायकल ट्रॅकचा मुद्दा आता चांगलाच चिघळत चाललेला आहे. स्थानिकांनी तसेच आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी विरोध करूनही हे कामकाज सुरूच आहे. नुकतेच तलावाभोवती काम सुरु असताना स्थानिकांनी बुलडोझरसमोर उभे राहूनच आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.

सायकल ट्रॅकमुळे अनेक नैसर्गिक संपदेचे खूप मोठे नुकसान होणार आहे. जूनमध्ये, महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पवई तलावाला भेट देऊन सायकलिंग आणि जॉगिंग ट्रॅकच्या कामाची पाहणी केली होती. एकीकडे पर्यावरणाच्या प्रेमाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे पर्यावरणाची हानी करायची असाच प्रकार असल्याचे दिसते आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये या ट्रॅकबद्दल नाराजी तीव्र होऊ लागली आहे.

वेटलँड तक्रार निवारण समितीच्या सदस्याने पवई तलावाच्या बाजूने सुरू असलेल्या सायकल ट्रॅकचे काम थांबवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि पर्यावरण मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. या प्रकल्पामुळे तलावाच्या जैवविविधतेचे नुकसान होईल. सध्याच्या घडीला काहीच प्रक्रीया न केलेले सांडपाणी सोडल्यामुळे धोका निर्माण झाला आहे.

पवई तलाव वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित भारतीय दलदलीच्या मगरींचे घर आहे. तलाव हा राष्ट्रीय वेटलँड ऍटलसचा भाग आहे आणि मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राष्ट्रीय वेटलँड तलावांचे संरक्षण करावे लागेल. तलावामध्ये वन्यजीवांच्या अनुसूची एक प्रजाती (भारतीय मार्श मगर) यासह मुबलक जैवविविधता आहे.

हे ही वाचा:

खड्डे, खोदकाम, वाहतूक कोंडीने वैतागले लोक

जस्टिन ट्रुडो यांनी पायावर धोंडा पाडून घेतला

पाकिस्तानमधील हिंदू मुलीने रचला ‘हा’ इतिहास!

बापरे!! बारावी शिकलेला डॉक्टर आणि कंपाऊंडर करत होते उपचार

सायकल ट्रॅक उभारल्यास तलावाचे क्षेत्र रोडावेल त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होईल. त्यामुळे मगरींना आयआयटी क्षेत्रात प्रवेश करण्यास भाग पाडले जाईल आणि यामुळे मानवांसोबत आणखी संघर्ष निर्माण होऊ शकतो असे स्थानिक तसेच पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.

Exit mobile version