साप, झुरळ, उंदीर आणि अगदी पक्षी… उड्डाण करताना विमानाने या सर्वांना पाहिले आहे. मात्रा आता कदाचित पहिल्यांदाच नागपूर ते मुंबईच्या विमान प्रवासादरम्यान एका महिला प्रवाशाला विंचवाने दंश केल्याची घटना समोर आली आहे. तिच्यावर मुंबईत ताबडतोब वैद्यकीय उपचार करण्यात आले, रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे आता या महिलेची प्रकृती ठीक आहे.
ही घटना २३ एप्रिल रोजी एअर इंडियाच्या एआय ६३० विमानामध्ये घडली. त्यानंतर मुंबई विमानतळावर डॉक्टरांसह तयार राहण्याचा संदेश देण्यात आला. ‘मुंबई विमानतळावरील वैद्यकीय पथकाने महिलेवर प्राथमिक उपचार करून तिला रुग्णालयात नेण्यात आले. तसेच, उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे,’ अशी माहिती एका व्यक्तीने दिली. या घटनेबाबत एअर इंडियाचे स्पष्टीकरण अद्याप मिळालेले नाही.
याआधी गल्फ इंडियाच्या बोइंग ७३७ विमानाच्या कॉकपिटमध्ये एक लहान जिवंत पक्षी सापडला होता. हे विमान गंतव्यस्थानी उतरल्यानंतर, पक्षी विमानातून बाहेर काढण्यात आला आणि सोडण्यात आला. डिसेंबरमध्ये, कालिकतहून दुबईला जाणाऱ्या विमानाच्या कार्गोच्या जागेत एक हजार ९१० किलो कडिपत्ता ठेवण्यात आला होता. तिथे एक साप आढळून आला.
विमानात अशा प्रकारे वन्यजीव सापडणे ही गंभीर घटना आहे. उंदीर विजेच्या तारा कापू शकत असल्याने विमाने पुढील उड्डाणासाठी सज्ज होत असताना त्यातील कीटक नष्ट करण्यासाठी धुरीकरण केले जाते. पक्ष्याच्या बाबतीतही एक घटना आखाती देशात नुकतीच घडली.
हे ही वाचा:
यूपी संस्कृत बोर्डाच्या परीक्षेत १४,००० मुलांना मागे टाकत मुस्लिम विद्यार्थी अव्वल !
सावध राहा! बंगालच्या उपसागरात ”चक्रीवादळ मोचा” !
उद्धव ठाकरेंनी बारसूची जबाबदारी ढकलली फुटीर आमदारांवर
डीआरडीओच्या ‘त्या’ शास्त्रज्ञाने हनी ट्रॅपमध्ये पैशाचा व्यवहार केला होता का?
बहारिनमधून भारतात परतणारे विमान वैमानिक आणि केबिन क्रूच्या नव्या संचासह उड्डाण करणार होते. तत्पूर्वी इंजिनीअर फ्लाइट डेस्कवर तपासणीसाठी गेला असताना त्याला कॉकपिटमध्ये एक लहान पक्षी दिसला. तेथून उडून जाण्यासाठी त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही त्याला दाद देईना. या इंजिनीअरने काही वेळ फ्लाइट डेकची खिडकी उघडली, जेणेकरून पक्षी स्वतःहून उडून जाऊ शकेल. सुमारे १० मिनिटांनंतर हा इंजिनीअर फ्लाइट डेकवर परतला, तेव्हा त्याला तो पक्षी कुठेही दिसला नाही. ना तो फ्लाइट डेकवर होता ना केबिनमध्ये. त्यानंतर पक्षी उडून गेला, असे गृहीत धरून विमान भारताच्या दिशेने झेपावले. आता हा विंचू विमानानंतर कुठे गेला, हे मात्र कळू शकलेले नाही.