शास्त्रज्ञांनी प्रथमच टिपल्या ताऱ्याच्या मरणकळा!

शास्त्रज्ञांनी प्रथमच टिपल्या ताऱ्याच्या मरणकळा!

नासाच्या केप्लर या दुर्बिणीने २०१७ मध्ये केलेल्या निरिक्षणांच्या डेटाच्या आधारे शास्त्रज्ञांना जगातल्या पहिल्या सुपरनोव्हाचे चित्र तयार करण्यात यश मिळाले आहे. शास्त्रज्ञांना अतिशय बारकाव्यासह चित्र तयार करण्यात यश आले आहे. त्यामुळे एका ताऱ्याचा मृत्यु होताना घडणाऱ्या घटनांविषयी अधिक माहिती मिळणार आहे.

ज्या सुपरनोव्हाचे चित्र शास्त्रज्ञांनी तयार केले आहे तो तारा पृथ्वीपासून सुमारे एक अब्ज प्रकाशवर्ष दूर आहे. त्याशिवाय हा तारा सुर्यापेक्षा किमान १०० पट मोठा असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा सुपरनोव्हा मानवजात अवतरण्याच्या ७ लाख वर्षांपूर्वी झाला. हा सुपरनोव्हा एका पित राक्षसी ताऱ्याचा झाला आहे.

सामान्यपणे, सुपरनोव्हा दृश्यमान होण्यासाठी आठवडे ते काही महिने लागू शकतात परंतु, ताऱ्याच्या स्फोटाची सुरूवात काही काळासाठीच पाहिली जाऊ शकते.

हे ही वाचा:

देशाला कंडक्टर सारखा ‘आगे बढो’ म्हणणारा पंतप्रधान हवा

जाहिरात प्रदर्शन नाही, मग करायचं काय?

बजरंगमुळे ब्रॉंझरंग

पुण्यातील व्यापारी अधिक आक्रमक होणार?

सामान्यतः आपल्याला ताऱ्याविषयी फार माहिती मिळू शकत नाही, कारण त्यांचा स्फोट होऊन गेलेला असतो आणि तिथे निरिक्षणासाठी काही शिल्लक नसते, असे ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल युनिव्हर्सिटीचे पी.एचडीचे विद्यार्थी पॅट्रिक आर्मस्ट्राँग यांनी सांगितले. या प्रकारचा सुपरनोव्हा टिपण्यासाठी योग्य वेळी अवकाशातील योग्य ठिकाणाचे निरिक्षण घेत असला पाहिजे.

केप्लर टेलिस्कोप दर अर्ध्या तासाने निरिक्षणे नोंदवत असल्याने शास्त्रज्ञांना या सुपरनोव्हाचे संपूर्ण निरिक्षण करणे शक्य झाले.

Exit mobile version