भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने सोमवारी ज्ञानवापी मशीद संकुलातील वैज्ञानिक सर्वेक्षण अहवाल एका सीलबंद पाकिटातून वाराणसी जिल्हा न्यायालयासमोर सादर केला आहे. ज्ञानवापी मशीद संकुलातील सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने एएसआयला मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आज हा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालाची एक प्रत सर्वोच्च न्यायालयातही पाठवण्यात येणार आहे.
हेही वाचा..
एनआयएची राज्यात छापेमारी, एक तरुण ताब्यात!
हिंदू मुलाशी प्रेम केले म्हणून मुस्लीम तरुणीची तिच्या भावांकडून हत्या
दाऊदच्या बातमीनंतर डोंगरीत सन्नाटा…
मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्न
या अहवालाबद्दल बोलताना हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव म्हणाले, एएसआयने वैज्ञानिक सर्वेक्षण अहवाल आज जिल्हा न्यायालयासमोर सादर केला आहे. १७ व्या शतकातील मशीद हि आधीपसून हिंदू मंदिराच्या अस्तित्वात असलेल्या रचनेवर बांधली गेली होती का नाही हे ठरवण्यासाठी विश्वनाथ मंदिराशेजारील ज्ञानवापी परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यात आले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेश कायम ठेवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. ज्ञानवापी समितीने या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.