मुंबईच्या शाळांमध्ये ४ ऑक्टोबर २०२१ पासून पुन्हा एकदा किलबिल ऐकायला मिळणार आहे. शाळा इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यामुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पहिल्या दिवशी मुले येणार म्हणून, त्यांचे स्वागत गुलाबाची फुले देऊन करण्यात येणार असल्याचे आता समजते.
सध्याच्या घडीला शाळा सुद्धा आता मुले येणार म्हणून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची तयारी करत आहेत. यामध्ये सॅनिटायझेशन करण्याची सुरुवात आता शाळांनी सुरु केलेली आहे. तसेच मुलांचे शरीराची तापमान तपासणी या सर्व गोष्टींची सोय आता शाळांकडून करण्यात येत आहे.
पहिल्या आठवड्यांत विद्यार्थ्यांना थेट शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी शाळेची सवय होण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. मार्च २०२० मध्ये साथीच्या रोगाच्या प्रारंभापासून मुंबईच्या शाळा बंद आहेत. त्यामुळेच विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये याच हेतूने आता शाळा पावले टाकणार आहेत. इयत्ता ८ वी ते १२ च्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आवश्यकतेनुसार शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचारी केवळ शाळांमध्ये यायला हवेत, अशी शाळांनी आता सोय केली आहे.
हे ही वाचा:
देगलूरमध्ये होणार पंढरपूरची पुनरावृत्ती? सुभाष साबणे यांना भाजपाची उमेदवारी
आर्यन खानसह तिघांना एनसीबीने केली अटक!
मुंबईतील मैदानांवर पुन्हा होणार क्रिकेटचा जल्लोष
…आणि आर्यन खानसोबत सेल्फी काढण्याचा मोह अधिकाऱ्यालाही आवरला नाही!
तसेच ज्या शाळांमध्ये लसीकरण केंद्रे होती त्यांनी शाळा आता स्वच्छ करण्याची तयारी केली आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देताना, विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग दररोज केले जाईल. तसेच कोणत्याही मुलांमध्ये कोणत्याही कोरोनाची लक्षणे आढळल्यास, पालक आणि प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राला कळवावे, असा आदेश प्रशासनाने काढलेला आहे.