कोरोना महामारी काळात ऑनलाइन सुरू असणाऱ्या प्राथमिक वर्गांच्या शाळा अखेर आजपासून सुरू झाल्या आहेत. मुंबईतील शाळांचे १ ली ते ७ वीचे वर्ग आजपासून सुरू झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना प्राथमिक शाळांचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले होते. स्थानिक प्रशासनाने स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली होती.
मुंबई पालिकेने मुंबईतील सर्व शाळांचे १ ली ते ७ वीचे वर्ग १५ ऑगस्ट म्हणजेच आजपासून सुरू करण्याचे आदेश दिले होते. काल पुन्हा परिपत्रक काढून बुधवारपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आजपासून मुंबईतील शाळांचे १ ली ते ७ वीचे वर्ग भरणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाणे शक्य नसल्यास त्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येईल अशा सुविधा उपलब्ध करून देणे ही शाळांची जबाबदारी असणार आहे.
हे ही वाचा:
लग्नाचा अनोखा स्टंट पडला महागात!
चीनच्या ‘आक्रमक कृती’विरुद्ध अमेरिकेचे महत्वाचे वक्तव्य
चार धाम महामार्गाच्या रुंदीकरणास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या शाळांची संख्या ३ हजार ४२० इतकी आहे. या शाळांमधील विद्यार्थी संख्या साडे दहा लाख इतकी आहे. मात्र, दुसरीकडे कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा अद्यापही ऑनलाइन वर्गावर भर असणार आहे. काही दिवसातच नाताळ सुट्टी असल्यामुळे या शाळा नाताळ सुट्टीनंतरच सुरू करण्याचा विचार आहे.
देशात आणि राज्यात शिरकाव झालेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रोन व्हेरियंटमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर काही पालकांमध्ये नाराजी दिसून आली.