27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषएक जुलैपासून मुंबईतील शाळा सुरु होणार- शास्त्रज्ञ

एक जुलैपासून मुंबईतील शाळा सुरु होणार- शास्त्रज्ञ

Google News Follow

Related

मुंबईतील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार, याविषयी दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाचा कोणताही नवा व्हेरिएंट न आल्यास मुंबईतील परिस्थिती जूनपर्यंत सर्वसामान्य होईल, असा अंदाज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांच्या एका टीमने वर्तवला आहे.

कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याने मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन सुरु आहे. एप्रिलपासून ब्रेक द चेन मोहिमेला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वेग आणि पॉझिटिव्हिटी रेट घटला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आहे. शहरातील लसीकरण कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरु राहिले, आणि कोरोनाचा कोणताही नवा व्हेरिएंट आला नाही, तर मुंबईतील परिस्थिती जूनपर्यंत सर्वसामान्य होईल, असा अंदाज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांच्या एका टीमने वर्तवला आहे.

मुंबईत आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं गणिती प्रारुपाच्या मदतीने विश्लेषण करून शास्त्रज्ञांनी ही भविष्यवाणी केली आहे.

जूनमध्ये शहरातील परिस्थिती सामान्य होईल. एक जुलैपासून शहरातील शाळा सुरू करता येतील, अशी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.

फेब्रुवारीत राज्यात कोरोना विषाणूचा एकच व्हेरिएंट होता. मात्र लोकल सेवा सुरू करण्यात आल्याने विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला. लोकल सेवा आणि अन्य गोष्टी सुरू होताच कोरोना विषाणूच्या फैलावासाठी पोषक वातावरण तयार झालं. त्यामुळेच शहरात दुसरी लाट आली, असं निरीक्षण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन

हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांना बंगालमध्ये तैनात करा

शरद पवारांच्या ‘अदृश्य हातांना’ पंढरपूरची एक सीट जिंकता आली नाही

पंतप्रधानांच्या या योजनेमुळे २ लाखांपर्यंतचे सुरक्षा कवच

फेब्रुवारीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी निर्बंध बरेच शिथिल करण्यात आले. त्यामुळेच मार्च महिन्यात परिस्थिती गंभीर झाली, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. कोरोना विषाणूचा सध्याचा व्हेरिएंट गेल्या वर्षी आढळून आलेल्या स्ट्रेनपेक्षा दोन ते अडीच पट अधिक संक्रामक आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा