25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेष'मेस्टा'ने केल्या राज्यातील काही शाळा सुरू

‘मेस्टा’ने केल्या राज्यातील काही शाळा सुरू

Google News Follow

Related

गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे होणार नुकसान लक्षात घेऊन महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन ( मेस्टा) या संघटनेने सरकारला शाळा सुरु करण्याची परवानगी मागितली होती. सरकारचा निर्णय झाला नाही तर आम्ही १७ जानेवारीपासून शाळा सुरु करू आणि कारवाईलाही सामोरे जाऊ असा इशारा मेस्टा संघटनेने दिला होता. त्यानुसार आज मेस्टा संघटनेअंतर्गत येणाऱ्या विविध शहरांतील तसेच ग्रामीण भागांतील काही शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.

औरंगाबादमधील ग्रामीण भागात जवळपास २५० शाळा सुरु केल्याचा दावा मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी केला आहे. औरंगाबादप्रमाणेच नागपूरमधील ३० ते ४० शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच, विविध शहरांतील किती शाळा आज सुरु करण्यात आल्या, याची आकडेवारी लवकरच कळवण्यात येईल, असेही मेस्टाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सध्या तरी मेस्टाच्या वतीने आठवी ते दहावीचे वर्ग सुरु करण्यात आल्या आहेत. कारण या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले असून त्यांना कोरोनाचा फारसा धोका नाही. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील शाळांतील हे वर्ग भरवण्यास काहीच हरकत नाही, असेही मेस्टातर्फे सांगण्यात आले आहे.

मेस्टा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तायडे म्हणाले, ‘ घोषणेप्रमाणे आज ग्रामीण भागातील शाळा सुरु झालेल्या आहेत. बऱ्याच शहरात आठवीनंतरचे वर्ग सुरु झाले आहेत. काही शाळांच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. आमच्या कामाची दखल म्हणून खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी आमच्याशी फोनवरून संपर्क साधला. राज्यातील शाळा टप्प्या-टप्प्यानं का होईना सुरु झाल्या पाहिजेत, असं त्यांनी सरकारला कळवलेलं आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळेंचे खूप खूप आभार. तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील शाळा सुरु करण्यासंदर्भात लवकरच एक बैठक घेऊन, निर्णय घेऊ,असं कळवलेलं आहे.

हे ही वाचा:

गोमांस तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला

‘मोदींना मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो’

संघर्षाला पर्यायी शब्द असेल तर तो एन.डी. पाटील!

उच्च न्यायालयाने फेटाळला नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन

 

मेस्टा संघटनेनं आजपासून शाळा सुरु केल्याचं जाहीर केल्यानंतर मेसा संघटनेनेही याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. शासनाने लवकरात लवकर शाळांबाबत निर्णय घेतला नाही तर २७ जानेवारीपासून मेसा संघटनेअंतर्गतच्या शाळाही सुरु करणार असल्याचं मेसाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा