शाळेतील विद्यार्थ्यांना लहान वयातच स्वाभिमान, देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात महाभारत आणि रामायणाच्या अभ्यासाचा समावेश करण्यात येणार आहे. एनसीईआरटीच्या (NCERT) पॅनेलने ही शिफारस केली असून त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटीने) शालेय अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी सात सदस्यांची एक उच्चस्तरीय समिती (NCERT Panel) स्थापन केली होती.या समितीचे अध्यक्ष सीआय इसाक हे आहेत.समितीने रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्यांचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्याची आणि शाळांमधील वर्गखोल्यांच्या भिंतींवर राज्यघटनेची प्रस्तावना लिहिण्याची शिफारस देखील केली आहे.समितीचे अध्यक्ष सीआय इसाक यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत शिकवणे महत्त्वाचे असल्याचे समितीचे अध्यक्ष सीआय इसाक यांनी सांगितले.सीआय इसाक पुढे म्हणाले की, “समितीने सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांसारखी महाकाव्ये शिकवण्यावर भर दिला आहे. आमचा विश्वास आहे की किशोरावस्थेत विद्यार्थ्यामध्ये स्वाभिमान, देशभक्ती आणि आपल्या राष्ट्राचा अभिमान वाढतो.”
हे ही वाचा:
सर्पदंशाने मृत्यू झालेल्या युवकाला जिवंत करण्याचा दावा; मृतदेहाच्या बाजूला तासन् तास झोपला मांत्रिक!
‘शेतात राब जाळणाऱ्या शेतकऱ्यांना किमान हमीभाव योजनेचा लाभ देऊ नये’!
मोदींना पनवती म्हणणे राहुल गांधींना भोवणार!
नाशिक शहर पोलीस आयुक्तांची उचलबांगडी; संदीप कर्णिक नवे पोलीस आयुक्त
सीआय इसाक म्हणाले की, देशभक्तीच्या अभावामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी देश सोडून इतर देशांचे नागरिकत्व घेतात. त्यामुळे त्यांची मूळे समजून घेऊन त्यांच्या देशाबद्दल आणि संस्कृतीबद्दल प्रेम वाढवणे गरजेचे आहे. सध्या काही शिक्षण मंडळे विद्यार्थ्यांना रामायण शिकवतात, मात्र ते पारंपारिक गोष्ट म्हणून शिकवतात. जर ही महाकाव्ये विद्यार्थ्यांना शिकवली गेली नसती तर शिक्षण पद्धतीचा कोणताही उद्देश नाही आणि ती राष्ट्रसेवा ठरणार नाही. पॅनेलने इयत्ता ३ री ते १२ वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्राचीन इतिहासाऐवजी ‘शास्त्रीय इतिहास’ समाविष्ट करण्याची आणि ‘इंडिया’ नाव बदलून ‘भारत’ करण्याची शिफारस देखील केली होती.
हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या सात सदस्यीय समितीने सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी अनेक शिफारसी केल्या आहेत. या शिफारशी एनसीईआरटीच्या नवीन पुस्तकांसाठी महत्त्वाचे निर्देशात्मक दस्तऐवज आहेत. राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन साहित्य समितीद्वारे (NSTC) जुलैमध्ये वर्गांसाठी अभ्यासक्रम, पुस्तके आणि शिक्षण सामग्री अंतिम करण्यासाठी समितीच्या शिफारशींचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.