‘मेरी माटी मेरा देश’ (Meri Maati Mera Desh) या मोहिमेअंतर्गत जम्मू पोलिसांनी श्रीनगरमध्ये ‘हर घर तिरंगा रॅली’ काढली. या रॅलीत अनेक शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी फलक आणि झेंडे हातात घेऊन मोर्चा काढताना दिसत आहेत.
‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमेची घोषणा पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात केली होती. ३० जुलै रोजी प्रसारित झालेल्या पंतप्रधान मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाच्या १०३ व्या भागात वीरांच्या स्मरणार्थ ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान सुरु करणार असल्याचे सांगितले. ९ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.या वर्षी १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा अभियान’ सुरू केले होते. ज्यामध्ये देशभरातील प्रत्येक घराच्या छतावर तिरंगा दिसत होता. त्याचबरोबर यंदा देशवासी ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाने स्वातंत्र्याचा सण साजरा करणार आहेत.
हे ही वाचा:
भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदावर चौथ्यांदा कोरले नाव
आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी
राज्यातील ‘आयटीआय’मध्ये व्हर्चुअल क्लासरूम सुरू होणार
दहशतवादी नाचण कुटुंबियांचे राजकीय कनेक्शन तगडे
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून ‘मेरी माटी मेरा देश मोहिम’ आयोजित करण्यात आले होते.पूर्व श्रीनगरचे डीएसपी शिवम सिद्धार्थ यांच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेद्वारे देशातील गायक नायकांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहेत. शनिवारी (१२ ऑगस्ट रोजी) मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील २६ पंचायती पासून या मोहिमेची सुरुवात झाली. गांदरबल येथील जिल्हा युवक सेवा आणि क्रीडा कार्यालयाने झोन कांगणमध्ये ‘मेरी माटी मेरा देश मोहीमची’ सुरुवात करत सकाळी मिरवणूक काढत आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.तसेच ‘हर घर तिरंगा अभियानाचे महत्त्वही लष्कराने सांगितले.एएनआय या वृत्तसंस्थेने या मोहिमेचा शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी फलक आणि झेंडे हातात घेऊन मोर्चा काढताना दिसत आहेत.
‘हर घर तिरंगा’ हे अभियान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची मोहीम आहे. या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनूसार ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात येतं.