शाळकरी विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी लांबणीवर!

शाळकरी विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी लांबणीवर!

कोरोनामुळे शाळकरी मुलांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द करून एप्रिल महिन्यात पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गरज पडल्यास रविवारी देखील शाळा सुरु ठेवण्यात येणार असल्याचेही शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष यंदा उशिरा सुरू झाल्याने त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल अखेर होणार आहेत. तर उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आली असून त्या सुट्ट्या विद्यार्थ्यांना मे आणि जून महिन्यात मिळणार आहेत. तसेच या दरम्यान शनिवारची अर्धी सुट्टी आणि रविवारची सुट्टी देखील रद्द करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे ज्या शाळेंचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, त्याच शाळा सुरु राहणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली आहे.

कोरोनाच प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दोन वर्षपासून राज्यात शाळा बंद आणि ऑनलाइन शिक्षण सुरु होते. राज्यात शाळा उशिरा सुरु झाल्या या काळात विद्यार्थ्यांचा राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यावर भर देण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

कोरोना काळात विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार

‘हिंदू सणांना परवानगी देताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारतो का?’

नुकतेच लग्न झालेल्या कबड्डीपटूचा खून

‘शरद पवारांचं आडनाव बदलून आगलावे ठेवा’

पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा या वर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत. परीक्षा उशिरा होत असल्यामुळे निकाल देखील उशिरा जाहीर करण्यात येणार आहेत. मे महिन्याच्या अखेरीस या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाईल असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र अनेक पालकांकडून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version