अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पुढाकाराने मुंबईतील शाळेच्या उपहारगृह (कॅन्टीन) मध्ये मिळणाऱ्या पिझ्झा, फ्रँकी, समोसे, सॉफ्ट ड्रींक्स, चिप्स ह्यावर बंदी घालण्यात आली असून, त्याजागी उत्तम दर्जाचे पौष्टिक आहार मिळण्याची व्यवस्था शाळा प्रशासनाला करण्यास सांगितली आहे. जंकफूडमुळे लहान वयातील मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात लठ्ठपणा तसेच रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन, आजारी पडण्याचे प्रमाण शाळकरी मुलांमध्ये वाढलेले आहे.
या उपक्रमाविषयी सांगताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांनी सांगितले की, फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे ‘द येलो बुक’चे या पुस्तकाच्या नियमाप्रमाणे लहान वयात आरोग्यदायी आहाराची चांगली सवय लागणे महत्वाचे असून, पौष्टीक अन्न बलवर्धक ठरते. तसेच हे पुस्तक पौष्टीक आहाराच्या संबंधित संकल्पनाचा परिचय करून देण्यास मदत करेल, असेही सांगितले. या उपक्रमांतर्गत पोर्टलद्वारे शाळांची नोंदी करण्यात आली असून, मुलांना समजण्यासाठी साध्या आणि सोप्या भाषेत ऑनलाईन पोर्टल वापरून शाळांना मार्गदर्शन केले.
ही वाचा:
जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!
आमिर खानने ‘तिला’ का सॅल्यूट केला नाही?
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती स्थिर
तसेच शाळेतील शिक्षक आणि पालकांना आरोग्य आणि निरोगीपणा समन्वयक म्हणून नेमण्यात आल्याचे केकरे यांनी सांगितले. लहानग्यांमधील स्थूलतेचा प्रमाण वाढत असून, लहानमुलांचे मैदानी खेळ विसरून शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्यामुळे लहानमुले कॉम्प्युटर गेम, टिव्ही, मोबाईल ऑनलाईन व्हिडिओ गेम्स, यासारख्या साधनांच्या आकर्षणांमुळे मुलं घरात बसून राहतात. यामुळे कॅलरीज जळत नाहीत व ते शरीरात वाढत राहतात. तसेच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार भारतातल्या शाळकरी मुलांमधील २० टक्के स्थूलपणा वाढल्याचे दिसते. असे विधान बालरोगतज्ज्ञ डॉ. नीता सोहनी यांनी केले.