शाळा तर सुरू होतील; पण स्कूलबसचे काय करायचे?

शाळा तर सुरू होतील; पण स्कूलबसचे काय करायचे?

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असताना राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत.

विद्यार्थी आणि पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी विद्यार्थी वाहतूक करण्याविषयी राज्य सरकारने कोणत्याही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या नाहीत. त्यामुळे स्कूलबस चालकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. दीड वर्षांनी शाळा सुरू होत असताना, कोरोना संबंधित मार्गदर्शक सूचनांशिवाय विद्यार्थ्यांची वाहतूक करावी लागणार असल्याचे स्कूलबस चालकांचे म्हणणे आहे.

गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा ४ ऑक्टोबरला सुरू करण्याचा निर्णय सरकारकडून देण्यात आला आहे. मात्र, शाळा रोज असणार की एक दिवसाआड असणार याबाबत कोणतेही स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची ने- आण करणाऱ्या बसही अनेक महिन्यांपासून बंद आहेत त्यामुळे काही गाड्यांचा विमा, पीयूसी आदींची मुदत संपलेली आहे. गाड्यांची डागडुजीही झालेली नाही.

हे ही वाचा:

एक कोटी लसीकरणाचा ‘पंच’

‘भारताला आणखी चार-पाच स्टेट बँक हव्यात’

भारत बंद म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार

आता आरटीओत न जाताच या संस्थांकडून मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स

कोरोनामुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच स्कूलबस चालकांनाही चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे स्कूलबस चालकांना सरकारने आर्थिक मदत करावी आणि शाळा सुरू करण्यापूर्वी शालेय बस संघटनेसोबत बैठक घ्यावी अशा मागण्या संघटनेकडून वारंवार करण्यात येत होत्या. मात्र, मदतही करण्यात आली नाही आणि बैठकही घेण्यात आलेली नाही. विद्यार्थी वाहतूक करण्याबाबत परिवहन विभागाकडून कोणत्याही सूचना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे एमएमआरमधील बस चालक नाराज आहेत, असे स्कूलबस ओनर्स असोसिएशनचे अनिल गर्ग यांनी सांगितले.

शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थी बसचा पर्याय निवडतील की नाही याबाबत संभ्रम आहे. स्कूलबसमध्ये पाचवीपर्यंतचे विद्यार्थी हे ६० टक्के असतात. तर सहावी- सातवीमधील २० टक्के विद्यार्थी असतात आणि आठवी ते दहावीचे २० टक्के विद्यार्थी असतात. विद्यार्थी वाहतूक हा महत्त्वाचा मुद्दा असूनही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील वाहतूक संघटनेचे संपर्क प्रमुख योगेश कांबळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वाहनांची फिटनेस चाचणी करण्यासाठी वेळ लागतो. तसेच गाड्यांची सर्व्हिसिंग यासाठीही वेळ लागणार आहे. बस मदतनीस यांची जमवाजमव करण्यासाठी सरकारने वेळ दिलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर स्कूलबस कोरोनापूर्व काळाप्रमाणे धावू शकतील की नाही याबाबत स्कूलबस चालक अजूनही संभ्रमात आहेत.

Exit mobile version