सांताक्रुज मधील पोद्दार शाळेतुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतून विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस तब्बल चार तास गायब होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत धाव घेतली. चार तास विद्यार्थ्यांना घेऊन बस गायब असल्यामुळे शाळा प्रशासनावर सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
आज पोद्दार शाळेचा पहिला दिवस होता. सकाळी सातला विद्यार्थ्यांची शाळा भरते त्यामुळे सहा, साडे सहाच्या आसपास विध्यार्थी शाळेत गेले होते. शाळा साडे बाराला सुटते, त्यानंतर तासाभरात विद्यार्थी बसने घरी पोहचतात. मात्र एक तास दोन तास नाही तर तब्बल चार तास उशिराने विद्यार्थी घरी पोहचले. विद्यार्थी एवढा वेळ घरी न पोहचल्याने बसशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता पालकांचा बसशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर पालकांनी शाळेत धाव घेतली, शाळातूनही पालकांना नीट प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर आले आहे.
साडेबारा ते साडेचार वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन बस कुठं गायब होती? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर पालकांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस पोद्दार शाळेमध्ये पोहोचले आणि प्रशासनाची चौकशी केली आहे.
हे ही वाचा:
केमिकल इंजीनियर अब्बासीने केला गोरखपूर मठाच्या सुरक्षा जवानांवर हल्ला
दोनच दिवसांत मुंबईची मेट्रो तीनवेळा बंद पडली
नवाब मलिक १८ एप्रिलपर्यंत कोठडीतच
‘ठाकरे सरकारमध्ये भ्रष्टाचाराची २०-२० ची मॅच सुरु’
दरम्यान, सांताक्रूझमधील विद्यार्थ्यांना घेऊन गायब झालेली बस सापडली सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. विद्यार्थी दोन तास उशिरा घरी पोहोचले होते. काही तांत्रिक कारणांमुळे विद्यार्थी उशिरा पोहोचले. शाळा त्या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करणार असून चालकाला रस्ते माहिती नसल्याने ही घटना घडली आहे, असे मुंबई पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले आहे.