रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज,मुंबई संचालित बालविकास विद्या मंदिर प्राथमिक विभाग जोगेश्वरी (पूर्व) शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी च्या २७० विदयार्थ्यांना मैत्री संस्थेच्या माध्यमातून “ओनेटी व्हाय” कंपनी तर्फे शालेय दफ्तरांचे वाटप करण्यात आले.
कंपनीचे विदेशातुन आलेले व इथले सन्माननीय संचालक ॲन्डी पीच, कोलीन फ्रायडे, हेमंत चोक्शी, अलोक मेहता, निशी म्यॅथ्यू यांचे स्वागत मुख्याध्यापिका सुषमा सावंत यांनी लहान लहान विदयार्थ्यांच्या हस्ते पुष्प देऊन केले. आलेल्या पाहूण्यांसमोर शालेय विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगुन सर्व विदेशी पाहूण्यांना मंत्रमुग्ध केले.उपस्थित पाहूण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हे ही वाचा:
पुणे जिल्हा सर्वसाधारण विजेता, पुणे क्रीडा प्रबोधिनी उपविजेते
‘आंदोलकांनो अंतरवाली सराटीत येऊ नका, मला उमेदवार ठरवू द्या!
गुजरातमध्ये दोन वेगवेगळ्या कारवाईत ४०० किलोहून अधिक ड्रग्ज जप्त!
उन्नावमध्ये मंदिर जिर्णोद्धाराला इस्लामी कट्टरतावाद्यांचा विरोध
संस्थेचे कार्याध्यक्ष श्री सहदेव सावंत यांनी ओनेटी व्हाय या कंपनीच्या पदाधिकार्यांचे आभार मानले तसेच मैत्र परिवाराच्या सामाजिक कामाचे कौतुक केले. चिटणीस सुरक्षा घोसाळकर, यशवंत साटम व सहखजिनदार विजय खामकर हे कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यकारी सदस्य दिपक खानविलकर यांनी मैत्र परीवाराशी संपर्क साधून हा शैक्षणिक उपक्रम घडवून आणला.संस्थेचे पदाधिकारी व पाहूण्यांच्या हस्ते सर्व विदयार्थ्यांना दफ्तर वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास मैत्री संस्थेचे संतोष दळवी व त्यांच्या सहकार्यांचे अनमोल सहकार्य लाभले.