राज्यपालांच्या हस्ते ५० युवा नादस्वरम वादकांना शिष्यवृत्ती प्रदान

राज्यपालांच्या हस्ते ५० युवा नादस्वरम वादकांना शिष्यवृत्ती प्रदान

श्री षण्मुखानंद ललित कला आणि संगीत सभेने षण्मुखानंद सभागृह येथे रविवारी आयोजित करण्यात केलेल्या नादस्वर उत्सव कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते देशातील ५० युवा नादस्वरम कलाकारांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले. युवा व होतकरू नादस्वरम वादकांना प्रत्येकी १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

हेही वाचा..

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई पोलीस दलात बदल्यांचे वारे

कंटेनर चालकाचे हातपाय बांधले आणि चक्क ‘ऍपल’ फोन पळवले !

इंडिगो विमानात कागदाच्या तुकड्यावर लिहिली होती बॉम्बची धमकी !

अर्णब गोस्वामीप्रमाणे बंगालमध्येही पत्रकाराची मुस्कटदाबी?

प्रसिद्ध नादस्वर वादक शेषमपट्टी श्री टी शिवलिंगम यांना श्री षण्मुखानंद नादस्वरम चक्रवर्ती संगीत कला विभूषण जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अडीच लाख रुपये रोख, सुवर्ण लेपित कांस्याचा दिवा, नादस्वरम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सभेचे अध्यक्ष डॉ व्ही शंकर, उपाध्यक्ष डॉ व्ही रंगराज, शेषमपट्टी श्री टी. शिवलिंगम आणि श्रीराम फायनान्सचे उपाध्यक्ष उमेश रेवणकर उपस्थित होते.

Exit mobile version