६ ऑक्टोबरला टी- २० विश्वचषक स्पर्धेत भारत- पाकिस्तान महिला संघ भिडणार!

आयसीसीकडून महिला क्रिकेट टी- २० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

६ ऑक्टोबरला टी- २० विश्वचषक स्पर्धेत भारत- पाकिस्तान महिला संघ भिडणार!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने म्हणजेच आयसीसीने महिला क्रिकेट टी- २० विश्वचषक स्पर्धेबाबत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. महिला क्रिकेट टी- २० विश्वचषक २०२४ या स्पर्धेचा ऑक्टोबर महिन्यात रंगणार आहे. तसेच या स्पर्धेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

महिला क्रिकेट टी- २० विश्वचषक २०२४ या स्पर्धेत एकूण १० महिला क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. एकूण १९ दिवस महिला क्रिकेट टी- २० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. १९ दिवसांमध्ये २३ सामने पार पडणार असून हे सर्व सामने बांगलादेशमधील ढाका आणि सिल्हेटमध्ये पार पडणार आहेत. यंदा बांगलादेशकडे विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे.

हे ही वाचा:

“यंदाच्या निवडणुकीत उबाठाच्या मशालीची चिलीम होणार”

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू!

गुजरातवरील विजयामुळे बेंगळुरूच्या ‘प्लेऑफ’मध्ये जाण्याच्या आशा जिवंत!

‘रोहित वेमुलाच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी’

गटात हे सामने खेळवले जाणार असून आयसीसीने १० संघांना पाच पाच अशा दोन गटात विभागलं आहे. त्यानुसार ‘ए’ गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि क्वालिफायर १ या संघांचा समावेश आहे. तर, ‘बी’ गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि क्वालिफायर २ या संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत चार सामने खेळेल आणि प्रत्येक गटातून पहिले दोन संघ हे सेमी फायनलसाठी पात्र होती. त्यानंतर अंतिम सामन्यासाठी दोन संघात सामना होऊन महिला क्रिकेट टी- २० विश्वचषक २०२४ स्पर्धेला विजेता संघ मिळेल.

महिला क्रिकेट संघांची गटात विभागणी

भारतीय संघांचे सामने

  1. विरुद्ध न्यूझीलंड, ४ ऑक्टोबर, सिल्हेट.
  2. विरुद्ध पाकिस्तान, ६ ऑक्टोबर, सिल्हेट.
  3. विरुद्ध क्वालिफायर १, ८ ऑक्टोबर, सिल्हेट.
  4. विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १३ ऑक्टोबर, सिल्हेट.
Exit mobile version